महादेवराव बी. एड. कॉलेज तुर्केवाडी मधील प्रशिक्षनार्थिनी वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाचा संकल्प
नूतन वर्षानिमित्ताने केला. या निम्मित्ताने महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. महादेवराव वांद्रे, प्रमुख पाहुणे प्रा. एस. बी. मगदूम( प्राध्यापक, जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय,गडहिंग्लज ), प्रभारी प्राचार्य श्री एन.जे. कांबळे, विभागप्रमुख प्रा. प्रधान ग. गो., प्रा. मुल्ला एम.आर., प्रा.पाटील वाय. पी., कार्यालयीन अधीक्षिका स्वप्ना देशपांडे प्रा. एस.पी. गावडे, श्री परशराम काजीर्णेकर, श्रीमती.दिपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बी. एड. द्वितीय प्रशिक्षनार्थिनी औषधी वनस्पतींची लागवड व उपयुक्तता, फुलबाग निर्मिती व त्यांचे महत्व, गांडूळ खत निर्मिती व त्यासंदर्भात जनजागृती करणे, प्लास्टिक मुक्त कॉलेज परिसर, घनकचरा व्यवस्थापन यासारखे विविध प्रकल्प हाती घेतलेले आहेत. यानिमित्ताने विविध प्रकारचे वनस्पती व वृक्ष लागवड आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थाध्यक्ष श्री. महादेवराव वांद्रे यांनी सर्वाना शुभेच्या दिल्या व सामुहिक प्रयत्नाने सर्व प्रकल्प यशस्वी करा आणि पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावा असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.व बी. एड. भाग 2 च्या प्रशिक्षनार्थी कडून घोषवाक्य देण्यात आली..झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा.झाडे ही माणसाचे मित्र, उगारू नका त्यांच्यावर शस्त्र.
वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी.
वृक्ष सारखा परम पवित्र नसे दुजा मित्र. व शेवटी प्रशिक्षनार्थी प्रकल्पगटप्रमुख किरण नाईक यांनी आभार मानले.