चंदगड प्रतिनिधी
म्हाळेवाडी येथे डोंगरी विकास काम अंतर्गत दहा लाख रू . निधीच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ माजी आमदार मान.राजेशदादा नरसिंगराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला . यावेळी सरपंच श्री. सी. ए .पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करून झालेल्या पराभवाने खचून न जाता माननीय राजेशपाटील साहेब दुसऱ्यादिवसापासून कामाला लागले असून आपणही कुठेही कच न खाता साहेबांना खंबीर साथ देवूया, साहेबांच्या कार्यकाळात मंजूर कामांचा शुभारंभ उत्साहाने करून विजयी झेप घेण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन उपस्थितांना केले तर राजेश पाटील साहेबांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना यापुढेही पराभवाने खचून न जाता जनसेवेसाठी सदैव तत्परअसेन गावागावात विकासकामांची खैरात वाटूनही , लोकं पैशाच्या मोहाने लाचार झाली याची खंत वाटते . या लाटेत चुकून वाहून गेलेल्यांना दूर जाण्याअगोदर जवळ करा … आपण कमी नाही आहोत स्वाभिमान आणि नितीमत्ता असणारी सच्ची साठ हजार माणसे आपल्या सोबत आहेत तेंव्हा या सच्चाई आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ताठ मानेने जिंकून दाखवू. अजितदादां सारखा नेता आपल्या पाठीशी आहे . कै. नरसिंगराव पाटील, कै सदाशिवराव मंडलीक साहेब यांच्या आशिर्वादाने आणि प्रेरणेने आपणासर्वांना यापुढेही कार्यरत रहायचे आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी दुप्पट ताकदीने कामाला लागा असे आवाहन यावेळी केले .
याप्रसंगी कोवाडचे सरकार अशोकराव देसाई, माजी सभापती बंडू चिगरे सो, घुलेवाडी सरपंच युवराज पाटील, राहुलबाबा देसाई, नेमाणा पाटील म्हाळेवाडी गावातील ग्रामस्थ, उपसरपंच विजय मर्णहोळकर , तंटामुक्त अध्यक्ष वसंत पाटील , पो.पाटील जगदीश पाटील ,ग्रा.प . सदस्या कल्पना पाटील, अनिता पाटील, शांता नांदवडेकर,अमृता कांबळे , ग्रामसचीव कविता जाधव , विठ्ठल हरी पाटील, भरमू सुबराव पाटील, एन.आर . पाटील, नागोजी कामाना पाटील , रघूनाथ पाटील, अरुण मर्णहोळकर, पी. एम्. पाटील सर,पी. एस . कांबळे, निंगाप्पा दळवी , गोपाळ दळवी, गणपती दळवी, सुरेश पाटील , आनंद पाटील , गुरुनाथ दळवी , रमेश पाटील , मनोहर पाटील आदी उपस्थित होते.