*आमदार साहेबानी सिमाभागातील माता-भगिनींना न्याय मिळवून दिला – सुस्मिताताई पाटील*
चंदगड प्रतिनिधी
*आज दिंडलकोप ता.चंदगड येथे आज महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ दौरा प्रसंगी सौ.सुस्मिताताई राजेश पाटील यांनी या गावी भेट दिली.यावेळी ताई म्हणाल्या चंदगड मतदार संघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात ज्या जाचक अटी होत्या त्या आमदार साहेबांनी विधानभवनात मांडून रद्द करून घेतल्या त्यावेळी खऱ्या अर्थाने सीमा भागातील महिलांना न्याय मिळाला.यामुळे आज त्या योजेनेचा लाभ घेऊ शकल्या.तसेच मतदार संघात सोळाशे कोटींची विकास कामे आणून साहेबांनी विकास कामांचा डोंगर रचला आहे.आशा माणसाला भरघोस मतांनी निवडून द्या व राजेश पाटील साहेब यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा,असे महिलांना,ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.यावेळी ज्योती पवार, पोमानी पाटील,सरपंच संजीवनी मनवाडकर ,लक्ष्मी मनवाडकर,देवजी कांबळे,बाळू मन वाडकर,कलाप्पा मनवाडकर, इराप्पा मनवाडकर,शिवराज मनवाडकर,बसवानी तरवाळ,अर्जुन दिंडे,देवजी कांबळे,अनिल कांबळे,नामदेव कोकितकर,काझी साहेब, तसेच विविध पदाधिकारी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.*