युवा उद्योजक अजित सरशेट्टी यांना ‘ राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त कडलगे बुद्रुक (ता चंदगड) गावचे ‘ युवा उद्योजक ‘अजित महादेव सरशेट्टी यांना ‘राष्ट्रीय दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्काराने ‘ सन्मानित केले.अतुल्य भारत प्रतिभा संमेलन,कोल्हापूर २०२४ कार्यक्रमांतर्गत ज्ञानसागर बहुद्देशीय सेवाभावी संस्था व स्काय इंटरन्यासणल टुरिझम या सेवाभावी संस्थेकडून त्यांच्या सामाजिक बंधीलकीची जाणीव ठेवून रविवार दि ६ रोजी राजश्री छत्रपती शाहु स्मारक भवन दसरा चौक,कोल्हापूर येथे चित्रपट व दूरदर्शन मालिकांतील सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद दास्ताने ह्यांच्या हस्ते ‘छत्रपती शाहू महाराज गौरव पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .