वर्डकॅम्प कोल्हापूरच्या वेबसाईटला भेट देऊन त्यात नोंदणी करण्याचे आवाहन
कोल्हापूर, ता. १८ : (प्रतिनिधी)
जर तुम्ही ब्लॉगर, फ्रीलांसर, व्यवसाय मालक, विकासक, डिझायनर किंवा विद्यार्थी असाल तर हे तुमच्यासाठी वर्डप्रेसने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. नवशिक्यापासून प्रगत वापरकर्ते आणि विकसकांपर्यंत सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येते. वर्डप्रेस समुदायामध्ये नेटवर्किंग, शिकणे आणि कल्पना सामायिक करण्यासाठी एक जागा प्रदान करतात. या संदर्भात कोल्हापुरात ११ व १२ जानेवारीमध्ये वर्डकॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
जानेवारीत होणाऱ्या या वर्डकॅम्प कार्यशाळेचे आयोजन डॉ. जयदीप पाटील, मकरंद माने, निलेश शिरगावे, प्रशांत पाटील, राजेंद्र घोरपडे, सायली मोकाशी, सुहानी इंगळे या कोल्हापुरातील उत्साही वर्डप्रेस व्यावसायिकांनी केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये आणि आजूबाजूच्या भागातील तंत्रज्ञान-जाणकार विद्यार्थ्यांचे झपाट्याने वाढणारे जाळे असलेले कोल्हापूर नाविन्यपूर्णतेचे एक भरभराटीचे केंद्र बनत आहे. हे लक्षात घेऊन कोल्हापूरच्या तंत्रज्ञान विकासास हातभार लावण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यशाळेमध्ये नवीनतम वर्डप्रेस ट्रेंड, साधने आणि तंत्र या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अनुशंगाने वर्डप्रेसचे व्यावसायिक आणि विचारवंत विकासापासून ते डिजिटल मार्केटिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सहकार्य करणार आहेत. या वर्डकॅम्पच्या अपडेट माहितीसाठी तसेच सहभागासाठी वर्डकॅम्प कोल्हापूरच्या वेबसाईटला भेट देऊन त्यात नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.