कोल्हापूर, ता. 14 : येथील राजेंद्र नगर परिसरातील संतोष पुंडलिक वाघु कर (वय 57 ) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा – एक मुलगी , चार भाऊ , तीन बहीण असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि. १५ रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशान भूमीत होणार आहे.
संतोष वाघुकर हे शाहू मिल कॉलनीचे माजी अध्यक्ष कै. धोंडीराम ढवळे यांचे जावई व तर कॉटन किंग ( राजारामपुरी ) चे श्रीधर ढवळे व साक्षी मिसळचे ( उमा टॉकीज जवळ ) गजानन ढवळे यांचे नातेवाईक होत.