सुटाचे मुख्य विश्वस्थ प्रा.एस.जी पाटील (बाबा) इशारा धरणे आंदोलन करणार
कोल्हापूर, ता. 2: (प्रतिनिधी )
सुटाच्या घटनेमध्ये बेकायदेशीररित्या अधिकार बाहय घटना दुरुस्तीचा मसुदा तयार करून वैयक्तिक आकांक्षेपोटी प्रा. संभाजीराव जाधव यांनी भविष्याचा वेध घेऊन, दुरदृष्टीने तयार केलेल्या सुटाच्या घटनेत, सुटाची संपूर्ण सत्ता एकहाती घेण्याच्या हेतूने जो बेकायदेशीर, अयोग्य व गैर स्वरूपाचा बदल करण्याचा प्रयत्न सुटाचे अध्यक्ष डॉ.आर. के. चव्हाण व त्यांचे प्रमुख सहकारी कोल्हापूर जिल्हाचे समन्वयक व विश्वस्थ प्रा. सुधाकर मानकर, सुटा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. जे. आर. जी कोरबू व तथाकथित घटना समितीचे निमंत्रक हे घटना दुरुस्ती करू पहात आहेत. त्याद्वारे घटनेची मोडतोड करून सुटाचा कारभार एक हाती जाण्याची शक्यता आहे.
त्याचा दूरगामी परिणाम संघटनेच्या एकसंघतेवर होणार आहे. तो थांबावा आणि प्रा. संभाजीराव जाधव यांनी दूरदृष्टीने सर्वसमावेशक केलेली घटना अबाधित रहावी, यासाठी संघटन सुटा संघटनेचे प्रमुख विश्वस्थ व मुख्य समन्वयक प्रा. एस.जी. पाटील तथा बाबा हे स्व:ताच सुटा संघटनेच्या दारात गुरुवार दि. ५ सप्टेंबर, शिक्षक दिना निमित्त दु. 3 ते 5 ते या वेळेत अंबाई डिफेन्स येथे इशारा धरणे आंदोलन करणार आहेत.
याद्वारे सुटा अध्यक्षासह त्यांना साथ देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये सांधिक भावना निर्माण व्हावी हा हेतू आहे.
दरम्यान, आज ‘सुटा बचाव संघर्ष समितीची स्थापना प्रा. डॉ. डी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या द्वारे कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्हयामध्ये सूटा आजी-माजी सदस्यांचे मेळावे घेऊन घटना दुरुस्ती मागील कुटील हेतू व खरी वस्तुस्थिती, होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती देण्यात येईल. या शिवाय पत्रकार परिषद घेऊन, समाजाला सूटामध्ये चाललेल्या बिकायदेशीर घडामोडींची माहिती देण्यात येईल. तसेच या सुरु केलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि वस्तुस्थिती विशद केली जाईल. या सुटा बचाव समितीमध्ये प्रा.डॉ. डी. एन. पाटील निमंत्रित निमंत्रक यांच्याबरोबर प्रा डॉ. अरुण पाटील, प्रा. गुंडोपंत पाटील, प्रा. संतोष जेठीथोर,प्रा. टी. व्ही. स्वामी, प्रा. युवराज पाटील, प्रा. प्रकाश तोरस्कर, प्रा. पांडुरंग फराकटे, डॉ. डी. आर. भोसले, डॉ. निवास वरेकर डॉ. रवींद्र दिवाकर, डॉ. अर्जुन जाधव आदी प्राध्यापकांचा समावेश आहे. सुटा बचाव संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत….
१) सुटाचा संभाव्य घटना बदल तात्काळ रद्द करावा.
2) सुटाच्या घटना बदलास जबाबदार असणारे सुटाचे अध्यक्ष डॉ.आर.के.चव्हाण, डॉ. आर. जी. कोरबू. प्रा. सुधाकर मानकर यांनी संघटनेमध्ये धारण केलेल्या सर्व पदांचे सत्त्वर राजीनामे दयावेत.