शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे महाराष्ट्र राज्यात जनसंवाद दौरा करत आहेत. या दौऱ्यात विधानसभा निहाय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद व आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या जनसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात पार पडणार असून, दि.३ व ४ सप्टेंबर २०२४ रोजी खासदार श्रीकांत शिंदे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
उद्या दि.०३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होईल. यानंतर ते आदमापूरकडे रवाना होणार आहेत. सकाळी श्री संत बाळूमामा मंदिरास भेट देवून दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता त्रिवेणी हॉटेल, आदमापूर येथे भुदरगड – राधानगरी व कागल या दोन विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
*यानंतर दुपारी २.३० वाजता दिगंबर जैन बोर्डिंग मल्टिपर्पज हॉल, कोल्हापूर येथे कोल्हापूर उत्तर व करवीर या दोन विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासह दुपारी ४.३० वाजता अभिषेक लॉन, ब्रम्हपुरी, कोल्हापूर येथे लाडकी बहीण भेट या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.* यानंतर सायंकाळी ६.०० वाजता महेश क्लब, इचलकरंजी येथे हातकणंगले- इचलकरंजी व शिरोळ या दोन विधानसभा मतदारसंघाचा आढावा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे घेणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.