प्रेस फोटोग्राफराच्या अवतीभवती छायाचित्रे प्रदर्शनास शाहू स्मारक कला दालनात प्रांरभ
-ज्येष्ठ फोटोग्राफर मालोजी केरकर यांचा होणार जीवनगौरव
कोल्हापूर, ता. 1, ( प्रतिनिधी ) –
अनेक अडचणीवर मात करीत कार्यरत पत्रकारितेचा उद्देशच समाज मनाचा प्रतिबिंब असा असतो, समाजातील अनिष्ट पद्धती विरोधात उभे रहाणे आणि गुणवंत लोकांचे कौतुक करन्याचे काम पत्रकारितेच्या छायाचित्रांच्या माध्यमातून होत असते, असे मत जेष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरातील प्रेस फोटोग्राफर यांच्या ‘अवती भवती’,छायाचित्र प्रदर्शनातून निसर्गाप्रमाणे समाजमनाचही प्रतिबिंब दिसून येते.
कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लब
आणि प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रेस फोटोग्राफरचे छायाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी जेष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी बोलत होते.
येथील राजर्षी शाहू स्मारक भवन मध्ये याप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये जगातील ३० प्रेस फोटोग्राफर यांच्या कलाकृती लावण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन उदय कुलकर्णी यांनी वृक्ष रोपाला पाणी घालून केले. यावेळी कोल्हापूर सकाळचे संपादक निखिल पंडितराव, बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी, पुण्यनगरीचे संपादक राजेंद्रकुमार चौगुले, संपादक विजय जमदाडे, लोकमतचे कित्तुरे, भारत कलर लॅबचे नंदकुमार मोरे, उद्योजक जयेश ओसवाल आदी उपस्थित होते . मोहन मेस्त्री, आदित्य विलास शशिकांत मोरे, पांडुरंग पाटील, मिलन मकानदार यांच्यासह प्रेस फोटोग्राफर आणि कोल्हापूरचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी जेष्ठ फोटो ग्राफर जॉनी ट्रेनर मूर्ती प्रित्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी मालोजी केरकर यांना देण्याचे घोषित करण्यात आले तसेच सुनील शेट्टी आणि राहुल गडकर यांनाही गौरवण्यात येणार आहे . आगामी तीन दिवस सुरू असणार आहे.