बालसंस्कारातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य शिक्षण संस्थांनी करावे
शालेय शिक्षण विभागाकडून महापालिकेच्या महात्मा फुले विद्यालयास रु.१ कोटी २० लाखांचा निधी मंजूर
कोल्हापूर दि.२६ : (प्रतिनिधी)
सद्याच्या घडीला काही शिक्षण सम्राटांच्या कडून शिक्षण क्षेत्राचे व्यावसायिकीकरण करण्याचे काम सुरु आहे. परंतु, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनी शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवला आहे. यामुळे पालकांचाही ओघ याच शाळांकडे वाढल्याचे दिसत येत आहे, ही बाब अंत्यत आनंददायी आहे, असे असे गौरवोदगार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूरमधील महात्मा फुले विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दक्षिण ना उत्तर, विकासपर्व दक्षिणोत्तर या संकल्पनेतून राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने शालेय शिक्षण विभागाकडून फुलेवाडी येथील महानगरपालिकेच्या महात्मा फुले विद्यालयास १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी राजेश क्षीरसागर यांनी महात्मा फुले विद्यालयास भेट देवून मंजूर निधीतून होणाऱ्या प्रस्तावित कामांची माहिती घेतली. यावेळी मंजूर केलेल्या निधीबद्दल शाळा प्रशासनाकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे आभार मानत विशेष सत्कार करण्यात आला.
सद्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जगभरात आधुनिकतेने प्रगती केली आहे. सोशल मीडियायाच्या माध्यमातून घडणाऱ्या घटना क्षणभरात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या जात आहेत. या आधुनिकतेचा जसा चांगला वापर होतो, त्याचपद्धतीने याचे दुष्परिणामही पहावयास मिळत आहेत. त्यामुळे आजच्या बालपिढीला बालसंस्काराद्वारे सुसंस्कृत करण्याचे कार्य शिक्षण संस्थांनी करावे, असे मार्गदर्शन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, वास्तविक पाहता सद्याच्या घडीला बालकाची घेतलेली काळजी, त्यावर झालेले संस्कार, बालकाला लागलेल्या सवयी, आवडी-निवडी यांचा पुढे संपूर्ण आयुष्यभर मोठा परिणाम होत असतो; आणि म्हणूनच गर्भसंस्काराइतकेच नंतरचे ‘बालसंस्कार’ संपन्न, सुसंस्कृत पिढीसाठी खूप मोलाचे असतात. त्यामुळे बालसंस्काराच्या माध्यमातून युवा पिढीला सुसंकृत बनविण्याचे काम शिक्षण संस्थांनी करावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
उपस्थित शिक्षकांनी शाळेकरिता अतिरिक्त निधी देण्याची मागणी केली. यावर आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही श्री.क्षीरसागर यांनी दिली.
क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडे कटाक्षाने लक्ष दया : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर ही क्रीडानगरी असून या मातीत अनेक नामवंत खेळाडू घडले. त्यांनी त्यांच्या क्रीडा प्रकारात देशाचे आणि कोल्हापूरचे नांव उज्वल केले. सध्याच्या घडीला नेमबाजी, भालाफेक आदी वैयक्तिक खेळातून खेळाडू देशासाठी पदक जिंकत आहेत. नेमबाज स्वप्नील कुसाळे हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे शालेय जीवनातचं क्रीडा प्रकारात विध्यार्थ्यांचा रस निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. पालकांनीही आपली मुले हीच आपली खरी संपत्ती समजून त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना चांगल्या- वाईट गोष्टींचे वेळोवेळी मार्गदर्शन करावे, असे आवाहन श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उपजिल्हाप्रमुख अमोल माने, नामदेव लव्हटे, महिला आघाडी शहरप्रमुख अमरजा पाटील, प्रीती अतिग्रे, उपशहरप्रमुख सचिन भोळे, धनाजी कारंडे, रत्नाकर पाटील, प्रदीप पाटील, अजित कारंडे, विजय जाधव, विजय भोसले, आबा पोवार यांच्यासह मुख्याध्यापिका सौअनुराधा रमेश शिंत्रे, शिक्षक कुलदीप कृष्णराव जठार, आनंदा मारुती पाटील, संतोष लक्ष्मण आंबेकर, कृष्णात वसंत यादव, सौ नयना विनायक बडकस, तुषार शिवाजीराव भापकर, उत्तम नारायण वाईंगडे, राहुल शिवालाल बागडे, संतोष विठ्ठल गोसावी, सौ स्वाती संभाजी चौगले, नितीन ज्ञानेश्वर गबाले, सौ माधुरी राजगोंडा चिंचणे, सागर नामदेव संकपाळ, सौरभ तुकाराम खाडे, मोठ्या संख्येने उपस्थित होते.