दहीहंडीकरिता प्रथम क्रमांकाचे रु.१ लाख व मानपत्र बक्षीस
कोल्हापूर दि.२६, (:प्रतिनिधी)
मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती हिंदुत्ववादी सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने राज्यात दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. हिंदुत्वाचा हा आपला आवडता उत्सव राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शिवसेनेच्या “भगवी दहीहंडी” चे आयोजन करून लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
गेली १७ वर्षे अखंडितपणे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ यांच्यावतीने “भगवी” दहीहंडीचे आयोजन करण्यात येते आहे. यंदा ही शिवसेनेची “भगवी” दहीहंडी भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. याकरिता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीकरिता प्रथम क्रमांकाचे रु.१ लाख व मानपत्र बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासह सलामीसाठी, थरांसाठी रोख रक्कमांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी खास स्पॉट गेमसह आकर्षक बक्षिसेही उपस्थित महिलांना देण्यात येणार आहे. यासह नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. सर्वात वर असणाऱ्या गोविंदाचा सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे . दहीहंडी कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी ढोल ताशा पथक असेल. दहीहंडीच्या सुरवातीस ढोल वाद्य पथकाकडून सलामी दिली जाणार आहे. शिवसेनेच्या “भगवी” दहीहंडीचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता “छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर” येथे होणार आहे.