शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी
कोल्हापूर, ता. २६ :
(प्रतिनिधी)
मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच घटकांकरीता जनकल्याणकारी योजना यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. दहीहंडी सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व असून, या सणाचे औचित्य साधून दरवर्षी शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. या दहीहंडी कार्यक्रमास शुभेच्छा देण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात लावलेल्या होर्डिंगवर शासनाच्या योजनांचा आलेख गोविंदाद्वारे दाखविण्यात आला असून, शासनाच्या योजनांचा जागरच एकप्रकारे या होर्डिंग द्वारे दाखविण्यात आला आहे