पुणे,कोल्हापूर, ता. 21- (प्रतिनिधी)- गत 41 वर्ष सातत्याने विनाखंड भरत नाट्यम् नृत्यृ प्रशिक्षण प्रबोधन प्रसार क्षेत्रात कार्यरत असलेल्या ओमकार कला मंगलम समूहाच्या सहा प्रतिभाषांगण आणि आचार्य अत्रे सभागृहात आरोग्य केंद्र हा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च कार्यक्रम सादर करून गुरुवंदना केली. यामध्ये वर्षा सुजिथ नायर – निशा संदिप नायर – दिप्ती दिपेश नायर – अषी शेट्ठी – लासिया शेट्टी – – लायना पायोस या गेली सात ते दहा वर्ष नृत्य साधना करीत असलेल्या विद्यार्थिनींनी ओमकारच्या संस्थापिका गीता नायर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर तपश्चर्या करत अखेर हा टप्पा पूर्ण केला.गणेश वंदना पासून सुरू झालेला हा नृत्य सादरीकरणाचा सोहळा विविध सादरीकरणाने रंगत गेला. त्यानंतर सहा ही नृत्यांगनानी व्यक्तिगत आपल्या कला सादर केल्या आणि शेवटी सामुदायिक गुरु विषयी आणि नटराज याविषयी आदरांजली व्यक्त करत या सोहळ्याची सांगता झाली. आचार्य अत्रे सभागृहात यावेळी कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच स्थानिक विविध पक्षाचे नगरसेवक त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, कला संघटना, हॉटेल व्यवसायिक यांच्यासह खासदार शिवसेना खासदार जेष्ठ नेते श्रीरंग भरणे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या सर्व कलाकारांचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आगामी काळात शालेय मूल्य शिक्षणाचा भाग म्हणून भरतनाट्यम नृत्य जोपासना व्हावी, यासाठी सर्वांनी आग्रही रहावे, आपणही त्यामध्ये सहभागी होऊ, असे खासदार रंग भरणे यांनी यावेळी सांगितले. मुसळधार पावसाचा साक्षीने सुरू झालेला 16 रात्री उशिरापर्यंत रंगला होता. पिंपरी ,चिंचवड पुणे थेट सातारा कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातून भरतनाट्यम प्रेमी या सोहळ्यास उपस्थित होते. पुण्याच्या आणि पिंपरीच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसा हा नृत्यृ सोहळा सूत्रबद्धपणे दीडशे हून अधिक संयोजकांच्या मदतीने संपन्न झाला. पुणे पिंपरी चिंचवड परिसराची सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरा अधिक व्यापक, अधोरेखित करणारा असा हा सोहळा अस्मरणीय असाच ठरला.