शिवनगे येथील श्री ताम्रपर्णी विद्यालय शालेय आंतरवासिता उदघाटन
कोल्हापूर, ता. 18 : (चंदगड प्रतिनिधी )
महादेवराव बी. एड् .कॉलेज तुर्केवाडी अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024 -25 बी. एड् . भाग 2 साठी आवश्यक असणारा शालेय आंतरवासिता कार्यक्रम टप्पा दोनचा उद्घाटन समारंभ श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवनगे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रशिक्षणामध्ये यावेळी शाळाप्रणाली समजून घेऊन शालेय आंतरवासिता यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहन उपस्थित मान्यवर यांनी केले.
दीपप्रज्वलन व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन समारंभासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री .पी. एस. सावगावे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ.प्रा. व्ही. आर. चव्हाण व मा. श्री महादेवराव नागोजी वांद्रे (संस्थापक महादेवराव बी. एड्. कॉलेज तुर्केवाडी )हे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून बी. एड्.विभागाचे प्रा.श्री.एन. जे. कांबळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून बदलत्या काळाची कौशल्य अवगत करून प्रशिक्षणार्थीनी प्रभावी अध्यापन करावे, तंत्रज्ञानाची जोड पारंपारिक अध्यापनाला देऊन आनंददायी कृतीयुक्त शिक्षणावर भर द्यावा, व प्रशिक्षणामध्ये शाळाप्रणाली समजून घेऊन शालेय आंतरवासिता यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे शिक्षक डी. जे पाटील, आर. एम बालेशगोळ सर, पी. एम. पवार, ऐ. इ. सुतार, पी.ए. केंगरे,व्ही. एस. शिंदे व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बी एड चे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्वांना मार्गदर्शन केले आणि सर्वांनी बी. एड. प्रशिक्षणार्थींना आंतरवासिता कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन बी.एड्. प्रशिक्षणार्थी अन्नपूर्णा कांबळे यांनी तर प्रास्ताविक छत्रपती शाहू महाराज गटाचे छात्रमुख्याध्यापक किरण नाईक यांनी केले. आभार छात्रउपमुख्याध्यापक वैजनाथ जाधव यांनी मानलें