स्थानिक परिसराची ओळख ठेवून कार्यरत राहण्याचा सल्ला
कोल्हापूर, ता. 13 – (प्रतिनिधी )
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर आणि नॅशनल असोसिएशन ऑफ स्टूडंटस ऑफ आर्किटेक्चर (NASA-INDIA) च्या कोल्हापूर, सांगली, सातारा या झोन-3 चॅप्टरच्या कॉलेज युनिट सेक्रेटरी तर्फे दोन दिवशीय विद्यापीठ स्तरावरील कार्यशाळा व स्पर्धा संपन्न झाली. दिल्लीतील नामांकित आर्किटेक्ट श्री नाईक यांच्या “कॉन्टेक्सो सॉरस” या कार्यशाळेचा समारोप सोहळा आज कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये संपन्न झाला.
नैसर्गिक लँडस्केपचा विशिष्ट संदर्भ आचरणात आणून आसपासच्या परिसराला योग्य प्रतिसाद देत इमारतरहित संकल्पना साकारली तर लँडस्केपचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखणे सहज शक्य आहे. सृजनशील पुन्नरूज्जीवन साकारताना आरामदायी मानवी स्केल अधोरेखित करून जर वास्तुचे डिझाईन केले तर त्या रचना ठळकपणे लोकांच्या लक्षात राहतील आणि आपला भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्याची मोठी भूमिका पार पाडतील.
श्री. नाईक यांनी कॉन्टेक्सो सॉरस या विषयावरील या कार्यशाळेमध्ये या कॉलेजच्या आणि बारावी पास झालेल्या एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेदरम्यान एक डिझाईनची स्पर्धा देखील घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या १० ग्रुप यांना वेगवेगळ्या डिझाईन बिल्डींग जसे की निवासी, सार्वजनिक, निमसार्वजनिक संस्था, पार्क, व्यावसायिक संस्था, शॉपिंग मॉल्स, सांस्कृतिक हॉल इत्यादी देण्यात आल्या. पहिल्या स्टेजमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही एक प्रकारची इमारत आणि सभोवतालचा परिसर निवडायचा आणि हवामान व स्थानिक संदर्भ यांचा अभ्यास करायचा होता. दुसऱ्या स्टेजमध्ये त्या साईटवरील नैसर्गिक लँडस्केपचा विचार करून व्यावहारीक उपाय शोधायचे होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या डिझाईनची अंमलबजावणी करायची होती. समारोप समारंभामध्ये १० पैकी ३ ग्रुपला विजयी संघ म्हणून घोषित करण्यात आले.
या समारोप सोहळ्यास कॉलेजचे प्राचार्य श्री. सी. एस. दुदगीकर, संवादप्रमुख प्रा.अंजली जाधव, नासा समन्वयक प्रा.वंदना पुसाळकर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थित होते. या कार्यशाळेस संस्थेचे चेअरमन मा. श्री. के. जी. पाटील यांचे सहकार्य लाभले.