संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह दुर्घटना : नाटकाच्या पुढील प्रयोगासाठीचे साहित्य आगीत जळाले, मुख्यमंत्र्यांनी तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्तांना ५ लाख दिले
कोल्हापूर दौऱ्यात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून २० कोटींचा निधी जाहीर
कोल्हापूर, ता. ९ — (प्रतिनिधी )
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
कोल्हापूर दौऱ्यात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रु. २० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पाहणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून, नाट्यगृहाच्या पाहणी नंतर उपस्थित कलाकारांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतल्या. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी या दुर्घटनेत रमेश सुतार, सुनील घोरपडे, मिलिंद अष्टेकर यांचे नाटकाच्या पुढील प्रयोगासाठी ठेवलेले लाखो रुपयांचे साहित्य मातीमोल झाल्याचे सांगितले. यावर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रु.५ लाखांची मदत नुकसानग्रस्तांना दिली.