वुशू असोशिएशन ऑफ कोल्हापुर डिस्ट्रिक्ट त्यांच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी चिंचवाड हायस्कुल चिंचवाड येथे १९ वी जिल्हास्तर सिनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा २०२४-२५ सांन्सू/तावलू प्रकारात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जन्म तारीख २६/०९ /१९८४ ते २६/०९ /२००६ आतील रजिस्टर खेळाडूंनी सांन्सु गणवेश व इतर साहित्य (ब्लु व रेड) गमशिल्ड, सेंटर गार्ड, चेस्ट गार्ड, ग्लोज, व तावलु इव्हेंट किट, इ. साहित्य तसेच आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड झेरॉक्स, फिटनेस सर्टिफिकेट, सहित स्पर्धेच्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजगोंडा वळीवडे यांनी केले आहे.