कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने रोहिणी खानदेव देवबा,रा.पठ्ठणकोडोली, यश काशिनाथ कामांना रा.पठ्ठणकोडोली, प्रथमेश सूर्यकांत पाटील रा.बानगे यांनी थायलंड येथे झालेले आशिया कुस्ती चॅपियनशिप स्पर्धेत यश संपादन केलेबद्दल तसेच प्रविण प्रकाश दिंडे रा.पिरवाडी यांची मुंबई पोलिस मध्ये निवड झालेबद्दल व समर्थ गजानन म्हाकवे रा.पठ्ठणकोडोली यांची जॉर्डन येथे झालेल्या रोमन कुस्ती स्पर्थेत यश संपादन केलेबद्दल त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते झाला. यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. हा कार्यक्रम गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला.
यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, ग्रामीण भागातील व्यक्ती आपल्या गुणवत्तेच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवत असून जिल्ह्याचे व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करत आहेत. अशा व्यक्तींना नेहमीच प्रेरणा देण्याचे काम गोकुळने केले आहे. सर्व सत्कारमूर्तींची कामगिरी ही कौतुकास्पद आहे. त्यांच्या भावी वाटचालीस संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मागील आठवड्यातील पूरस्थितीमुळे सर्व रस्ते बंद झाल्यामुळे काही मार्गावरील दूध वाहतूक बंद झाली होती. दूध उत्पादकांचे नुकसान होऊन नये म्हणून स्वतः पुराच्या पाण्यात उतरून दूध वाहतूक सुरळीत करून संकलित झालेले सर्व दूध पर्यायी मार्गाने चिलिंग सेंटरवर व गोकुळ प्रकल्पाकडे पोहोच केलेबद्दल संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक किसन चौगले, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, संकलन अधिकारी शरद तुरंबेकर, दत्तात्रय वागरे यांचा तसेच एका वृतवाहिनीच्या कृषी सन्मान कार्यक्रमामध्ये आयोजित चर्चा सत्रामध्ये गोकुळची दुग्ध व्यवसाय वाढीसाठीची भविष्यातील भूमिका मांडलेबद्दल संचालक अजित नरके यांच्या संघांचे चेअरमन व उपस्थित संचालक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.