केदारलिंग सेवासंस्थेत आपले सरकार ई सेवा केंद्राचे उद्घाटन
कोल्हापूर, ता. 26 (कळे प्रतिनिधी )
वेतवडेत ई सेवा केंद्र नसल्याने ग्रामस्थांना विविध कामांसाठी दूर अंतरावरील ई सेवा केंद्रात जावे लागत होते. यात त्यांचा वेळ आणि पैसा खर्ची पडत होता. ही गैरसोय लक्षात घेऊन
पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केदारलिंग विकास सेवा सोसायटीत केंद्र सरकारच्या योजनेनुसार आपले सरकार ई सेवा केंद्र सुर करणेत आले. त्याचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
ग्रामीण भागातील लोकांना व शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, विविध प्रकारचे फॉर्म, आधारकार्ड लिंकिंग,सात बारा उतारा , पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल रिचार्ज,वीज बील भरणा,हयातीचा दाखला, मार्क लिस्ट,डोमिसाईल सर्टिफिकेट यासह विविध ऑनलाईन कामे करता यावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेनुसार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणाऱ्या विकास सेवा संस्थांमध्ये आपले सरकार ई सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली असून त्याची ताबडतोब अंमलबजावणी सुरू आहे.त्यानुसार वेतवडे येथील केदारलिंग विकास सेवा सोसायटीत संस्था पदाधिकारी व गावातील केडीसीसी बॅंकेचे निरिक्षक व शाखाधिकारी यांच्या उपस्थितीत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.त्यामुळे यापुढे केदारलिंग सेवा संस्थेत शेतकरी व नागरिकांनी आपले सरकार ई सेवा केंद्रांतर्गत आपली कामे करुन घेण्याचे आवाहन गावातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले.
यावेळी केडीसीसी बॅंकेचे निरिक्षक राजु देसाई, शाखाधिकारी रवी कालेकर ,सचिव शंकर डकरे, चेअरमन बाबु महादेव दळवी,व्हा चेअरमन विष्णू सुतार , रघुनाथ पाटील, जयसिंग पाटील, शिवाजी पाटील यासह संस्थेचे सर्व संचालक,क्लार्क जीवन सोनार यासह गावातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.