आज म्हाळेवाडी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. गावच्या सौंदर्यात आणि उत्पन्नात भर पडेल या हेतूने सरपंच श्री. सी.ए. पाटील यांनी आपल्या मानधनातून दिलेल्या सुपारीच्या झाडांचे मुख्य रस्ता आणि प्राथमिक मराठी शाळेच्या परिसरात आम्ही म्हाळेवाडीकर गृपच्या माध्यमातून वृक्षारोपण केले. यावेळी उपसरपंच विजय मर्णहोळकर, गुरुवर्य एन.आर. पाटील, रघूनाथ पाटील, डी .एल. पाटील, तंटामुक्त उपाध्यक्ष अरुण मरणहोळकर , पो.पाटील जगदीश पाटील, निंगाप्पा दळवी,बँक ऑफ बरोडाचे कॅशिअर प्रशांत कांबळे, फौजी प्रकाश पाटील,बी. आर. पाटील, डीबी पाटील, पाणी सल्लागार सचिन पाटील, विलास पाटील, रमेश पाटील,ज्ञानेश्वर कोकीतकर, पत्रकार अभिजीत कांबळे, एकनाथ कांबळे, विठोबा पाटील, गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. रोप उपलब्ध करून देण्यासाठी श्री अनिल दळवी व उमेश पवार यांनी सहकार्य केले.