बी. एड. च्या विद्यार्थ्यांकडून श्री. नाईक यांचा हृद्य सत्कार
कोल्हापूर, चंदगड ता. २० – (प्रतिनिधी )
अंगात जिद्द, चिकाटी,मेहनत असेल तर कोणत्याही प्रकारचे यश खेचून आणता येणे शक्य आहे, असे मत शिक्षक प्रशांत नाईक यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र पवित्र पोर्टलद्वारे सातारा येथील रयत शिक्षण संस्था येथे निवड झालेल्या प्रशांत नाईक यांचा सत्कार येथील मित्र मैत्रिणी परिवारातर्फे करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. तूर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. कॉलेज येथे शनिवारी हा सत्काराचा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रा. एन. जे.कांबळे , प्रा. ग गो. प्रधान यांची शुभेच्छापर मनोगते झाली. प्रशांत नाईक यांनी यशाचा प्रवास उलगडून दाखवला. यावेळी संस्थेच्या ओ. एस. श्रीमंती एस. आर. देशपांडे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य एस. पी. गावडे, विठ्ठल नाईक, अल्फाजअली नाईक, सोनाली वळतकर, सुलोचना भोगण,सुरेखा कोळी, स्नेहल सावंत, लक्ष्मण कांबळे, अभिजीत कांबळे उपस्थित होते. सुत्रसंचालन मोहन चव्हाण यांनी तर आभार मयुरी कांडर यांनी मानले.