रयत शिक्षण संस्था सातारा येथे माणगाव येथील प्रशांत नाईक यांची शिक्षकपदी निवड
कोल्हापूर, ता. १५ — (समाज धन टाइम्स प्रतिनिधी) चंदगड तालुक्यातील माणगाव येथील प्रशांत सटुप्पा नाईक यांची महाराष्ट्र पवित्र पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या शिक्षक पद भरती मधुन सातारा येथील रयत शिक्षण संस्था येथे प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली. या निवडीबद्दल गावातील उपसरपंच बाबुराव दुकळे, माजी सरपंच महादेव सांबरेकर, उदय नौकुडकर, वैजू पिटुक, रवी चव्हाण, सुरुतकर, कुंभार, संतोष वाघमोडे, प्रकाश नाईक यांनी घरी भेट देऊन सत्कार केला. यावेळी त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. यावेळी एका ग्रामीण भागातून श्री. नाईक यांची झालेल्या निवडीचा आनंद त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, घरच्यांचे डोळे पाणावले होते आणि याचा त्यांना अभिमान ही वाटत होता. प्रशांत नाईक यांनी घेतलेले कष्ट, मेहनत फळाला आली आहे. त्यांच्या या यशाचे मोठे कौतुक
सर्वच स्तरातून होत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या कौतुकाच्या वर्षावामुळे त्यांना लढण्याचे, जीवनात पुढे जाण्याचे आणि आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाच चीज करण्याच बळ मिळाल आहे.
यासाठी त्यांना स्वामी विवेकानंद अभ्यासिका , प्रा.ग.गो.प्रधान, प्रा.एन. जे. कांबळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.