साखर कारखान्यातील इलेक्ट्रॉनिक वजन काटे तपासणीसाठी गेलेल्या भरारी पथकाने खाबुगीरी करून कार्यप्रणालीच्या विसंगत अशी तपासणी केलीय. त्यामुळे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरमधील साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांना बुधवारी दिला. या मागणीचे निवेदनही यावेळी त्यांना देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हयातील साखर कारखान्यांकडून काटामारीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी पुणे प्रादेशिक साखर आयुक्तांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि नियंत्रण वैद्यमापन शास्त्र यांच्याकडे प्रस्ताव सादर करून वजनकाटा तपासणीची कार्यप्रणाली निश्चित केली . त्यानुसार साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यप्रणाली प्रमाणे वजन काटे तपासणीचे आदेश दिले. या भरारी पथकामध्ये तहसिलदार, पोलीस , शेतकरी प्रतिनिधी, वैद्यमापन शास्त्र आणि साखर
सह संचालक विभागातील लेखापरिक्षक यांचा या भरारी पथकात समावेश होता. काटा तपासणीची कार्यप्रणाली सुद्धा दिली गेली.
या कार्यप्रणालीमुळं साखर कारखान्यांचा वजन काटा घोटाळा उघड होणार होता. परंतु तपासणी पथकातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी खाबुगीरी करून घालून दिलेल्या कार्यप्रणालीच्या विसंगत अशी तपासणी करुन कारखान्यांना अभय दिलं गेल्याच संघटनेच्या निदर्शनास आले. याबाबत सर्व पुराव्यानिशी संभाजी ब्रिगेडचे राज्य सह संघटक रुपेश पाटील यांच्या शिष्टमंडळानं कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांची बुधवारी भेट घेतली. भरारी पथकातील भ्रष्ट अधिकऱ्यांनी कार्यप्रणालीच्या विसंगत कशा पद्धतीने तपासणी करून साखर कारखान्यांची पाठराखण केल्याचं पुरण्यानिशी निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे या भरारी पथकातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळान साखर सहसंचालक कोल्हापूर यांना दिला.
या शिष्टमंडळात योगेश जगदाळे, राहूल पाटील, संभाजी साळोखे, दतातय मेटिल, भैरवानाथ घाटगे, नागनाथ बेनके, भिमराव पाटील, सरदार पाटील, अभिजित कांजर यांचा समावेश होता .