सुरेश खांडेकर – गोकुळ संचालक चेतन नरकेसह मान्यवरांची उपस्थिती
कोल्हापूर, ता. १० – (प्रतिनिधी) जायंटस् ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीचा १७ वा शपथविधी आणि नूतन पदाधिकारी पद ग्रहण सोहळा खोल खंडोबा सभागृहात उत्साही वातावरण झाला . नूतन अध्यक्षा श्रीमती माधुरी दीपक भोसले -पाटील यांच्यासह सर्व नुतन पदाधिकारी – संचालक यांनी यावेळी शपथविधीसह आपली जबाबदारी स्वीकारली. जयंत वेल्फर फाउंडेशनचे युनिट डायरेक्टर सुरेश खांडेकर यांच्यासह गोकुळ संचालक सहकार अभ्यासक चेतन अरुण नाईक आदींची यावेळी उपस्थिती होती . ‘स्थानिक ते वैश्विक अशा विविध पैलूंनी कार्यरत असलेल्या कार्याचा ठसा सर्वदूर उमटवला आहे यामध्येही जायंटस् ग्रुप रंकाळा चौपाटी विविध पर्यावरण पूरक आणि सामाजिक उपक्रम सातत्याने सक्रिय आहे नवीन उमेदीच्या टीमनेही अध्यक्षासह ही परंपरा अधिक व्यापकतेने पुढे न्यावी अशा शब्दात गोकुळ संचालक चेतन अरुण नरके यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रमुख पाहुण्यांसह सर्व मान्यवरांनी झाडांना सामुदायिकरीत्या पाणी घालून आणि फोटो पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय समिती सदस्य प्रमोद शहा ( मामा ) जिजाऊ फाउंडेशनच्या धनश्री सचिन तोडकर, विशेष समिती सदस्य मंदाकिनी साखरे, राजकुमार पोळ , रामदास रेवणकर आदी सह डॉक्टर शरदचंद्र दिवाण, प्रकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक अध्यक्षा बबिता जाधव यांनी आजवरच्या कार्याचा आढावा घेत व्यापक प्रमाणात आगामी काळाची नुतन कार्यकारणीसह सर्व सदस्य जोमाने कार्यरत राहतील अशी ग्वाही दिली. संचालिका श्रीमती कांचन समुद्रे यांनी यांनी प्रास्ताविक केले तर पाहुण्यांची ओळख तानाजी पाटील यांनी करून दिली.यावेळी उपस्थित युवा सेना जिल्हाध्यक्ष – अभिनेते मंजित माने यांनी जायटस् ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीचे विविध कार्यक्रमात आपण नेहमी सहभागी असतो आणि आगामी काळात राहू असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित राहिलेले जेंट्स वेलफेअर फाउंडेशन च क्रमांक 9 चे युनिट डायरेक्टर सुरेश खांडेकर यां नी नुतन अध्यक्षा श्रीमती माधुरी दीपक भोसले पाटील सह उपाध्यक्षा अनिता अनिल काळे – सुनंदा मोरे,कार्यवाह कमल पाटील, खजिनदार शशिकांत कुलकर्णी सहकार्या व शुभदा कामत कामत ,तानाजी पाटील ,आयपीपी समिती कांचन समुद्रे यांच्यासह नूतन संचालक डॉक्टर अस्मिता जाधव , सारिका शिंदे , लक्ष्मी माळी, पृथ्वीराज पाटील , उदय निगडे , शुभांगी तावरे , शारदा शेट्टी, सुनीता मेंगाणे, वैशाली कदम आणि राजेंद्र मकोटे यांना शपथ दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते मावळते अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या सोहळ्यास सल्लागार समितीचे डॉक्टर सागर पाटील , संजय कुलकर्णी , अरविंद देशपांडे ,सत्यजित जाधव ,राजाराम हटकर यांच्यासह शिल्पा पाटील ,चांदणी काळे ,संजय कुलकर्णी सह विविध ग्रुपचे पदाधिकारी संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी शुभदा कामत यांनी केले तर आभार सुनंदा मोरे यांनी मानले. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली.