कोल्हापूरमधील स्टेशन रोडवरील रेल्वे स्टेशन गेट जवळ ३ महिला अश्लील हावभाव करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून त्यांना वेश्यागमन करण्यासाठी आकर्षित करत होत्या. सार्वजनिक ठिकाणी त्यांचेही हे आसभ्य वर्तन सुरू होते.
याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर या तीन महिलांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी सव्वा एक वाजन्याच्या सुमारास स्टेशन रोडवरील रेल्वे स्टेशनच्या एका गेट जवळ तीन महिला अश्लील हाव भाव करून आणि सांकेतिक इशारा करून इथून येणारे जाणाऱ्या नागरिकांना वेश्यागमनसाठी करण्यासाठी आकर्षित करत होत्या. तसेच त्या आसभ्य वर्तन करताना प्रत्यक्ष आढळल्या. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस वनिता घारगे यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर याप्रकरणी या तिन्ही महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील २ महिला सदर बाजार, तर एक महिला आजरा तालुक्यातील
भादवण येथील आहे. त्यांचे वय ३३ ते ५३ या वयोगटातील आहे. यातील एक महिला सदर बाजारमध्ये राहत असली तरी ती मूळ पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. याबाबतचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.