महापालिका अधिकाऱ्यांची नुसतीच पाहणी – स्थानिक नागरिकांची तक्रार
कोल्हापूर, ता. ५ -(महेश गावडे)
पांजरपोळ रोडवरील शाहू मिल कॉलनीच्या मार्गावर असणाऱ्या ड्रेनेजचे झाकण तुटलेले आहे. संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी या तुटलेल्या
ड्रेनेजचे ठिकाणी वृक्षारोपण केले आहे.
दरम्यान महापालिकेच्या संबंधित अधिकारी गेले दोन दिवस फक्त घटनास्थळाची पाहणी करतात आणि जातात. मात्रर, उपाययोजना काहीच करत नसत नाहीत, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी समाजधन टाइम्सकडे केली आहे.
दरम्यान या ड्रेनेजवरील योग्य मापाचे झाकण मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ही समस्या जैसे थे आहे.
पांजरपोळ रोडवर शाहू मिल कॉलनी परिसरात रस्त्याच्या मध्यभागी एक ड्रेनेज आहे. मात्र हे ड्रेनेजचे झाकण गेल्या काही दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून अधिकारी या ठिकाणी येऊन जातात. मात्र कार्यवाही काहीच करत नाहीत, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. याशिवाय हा रस्ता. खालून घुशी आणि उंदराने पोखरला असून रस्त्याचे खच्चीकरन झाल्याचे दिसत आहे. याशिवाय या परिसरातील गटार ही थुंबल्या आहेत.
या मार्गावर याच ठिकाणी काल ता. ४ रोजी एक अपघात झाला असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.
त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेता या ड्रेनेजवरील झाकण महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित बसवावे आणि संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, या परिसरात डेंगू सदृश्य आजार वाढण्याचा धोका यामुळे वाढला आहे.