सांगली जिल्ह्यातील जत पूर्व भागात भूगर्भातून येतोय मोठा आवाज –
नेमक्या कारणांचा शोध घेणे आव्हानात्मक काम.
ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया – प्राध्यापक जाधव
आपल्या पृथ्वीवर अनेक अशा गुढ आणि रहस्य घटना घडतात. की ज्या घटनांची आपण कल्पनाही केली नसते. या अजब आणि गजब घटना का घडतात यामागे विविध शास्त्रीय, वैज्ञानिक कारणे देखील कारणीभूत असू शकतात. निसर्ग नियमात झालेला मोठा आणि प्रभावकारी बदल हे कारण देखील जबाबदार ठरू शकते.
यापैकी बऱ्याच अशा घटना का घडतात, याचा शोध घ्यायला गेले असता, त्याच्या मुळापर्यंत जाता येऊ शकत नाही. त्या घटनांची उकल करता येत नाही, किंवा त्या घटना का घडतात, याचा नेमका शोधही घेता येत नाही. त्यावर वर्षानुवर्षे रिसर्च होत राहतात. मात्र त्यातून निष्कर्ष क्वचितच हाती लागू शकतो. आता हेच बघा ना सांगली जिल्ह्यातील जत पूर्व भागात भूगर्भातून मोठे मोठे आवाज येत असल्याने तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. हा आवाज कोणाचा, असे ते म्हणत आहेत, यासाठी जो, तो भीतीने आपल्या मनाचा आवाज ऐकत असतील,
असा आवाज येण्यामागे काही विपदा तर येणार नाही ना किंवा भविष्यात एखाद संकट तरी आपल्यावर येणार नाही, या चिंतेने ते ग्रासले असतील.
ना घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेणे हे यंत्रणेसाठी आणि या या क्षेत्रातील तज्ञांसाठी हे एक आव्हानात्मक काम असेल, असेच वाटत आहे.
सांगली जिल्ह्यातील जत येथील भागात भूगर्भातून मोठा आवाज येत असल्याने तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील भूगर्भ विषयातील तज्ञाची संवाद साधला असता त्यांनी हा आवाज येणे हा भूकंपाचा सौम्य धक्का किंवा नैसर्गिक प्रतिक्रियाही असू शकते असे स्पष्ट केले. तसेच या प्रकाराबाबत त्यांच्यात ही मत मंतांतरे ही दिसून आली.
सांगली जिल्ह्यातील जत येथील पूर्व भागात गेल्या २ ते ३ महिन्यापासून भूगर्भातून असे आवाज येत असल्याचे बोलले जात आहे. आसपासच्या २ ते ३ गावांसह विजापूर मधील काही गावात देखील असाच प्रकार निदर्शनास येत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झालेत.
वास्तविक सांगली जिल्ह्यातील जत हा भाग दुष्काळ प्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. भूजल अधिनियम नुसार जमिनीच्या २०० फुटाच्या खाली बोआर वेल मारण्यास परवानगी नाही. मात्र या ठिकाणी सुमारे १५०० ते १८०० फूट खोल पर्यंत पाणी लागे पर्यंत बोआर मारली जाते. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अति उपशामुळे भूगर्भातील पाण्याची पोकळी निघून जाते. अर्थात, पाण्याचा स्तर कमी झाला की, अति उपसामुळे जमिनीखाली पोकळी निर्माण होते. ही पोकळी हवेची असते. पोकळीची देखील आपल्यावरील भुस्तराची वजन पेलण्याची एक क्षमता असते. ही क्षमता पेलली गेली नाही तर ती ज्या ठिकाणी वाट मिळेल तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. अशावेळी त्या त्या स्पॉटला असे आवाज येतात.
यापूर्वी असाच प्रकार महाराष्ट्रातील जळगाव, लातूर, बीड, धुळे अशा ठिकाणी झालेला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
कमला कॉलेजमधील माजी भूगर्भ शास्त्रज्ञ प्राध्यापक जाधव यांनी सांगितले की, भूगर्भातून आलेला आवाज हा भूकंप धक्क्यामुळे सुद्धा येऊ शकतो. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. काही वर्षांपूर्वी कर्नाटकामध्ये काही भागात भूगर्भातील दगडांच्या भेगांमध्ये नैसर्गिक गॅस जमा झाल्याचे पाहायला मिळाले होते. तेथील काही ठिकाणी आठ ते दहा वर्षांपूर्वी बोअर मारल्यावर गॅस बाहेर पडत होता. भूगर्भात असे छोटे छोटे पॉकेट असू शकतात, त्यामध्ये नुसती हवा देखील असू शकते. भूकंप म्हणजे दगडांच्या
घर्षणातून निर्माण होणारी एनर्जी.
या एनर्जीला जेव्हा बाहेर पाडायला जागा मिळत नाही, अडथळा निर्माण होतो, तेव्हा असे प्रकार घडू शकतात.
जतचां विचार केल्यास येथील बऱ्याच ठिकाणी सुमारे 1800 फुटापर्यंत बोरवेल मारण्यात आले आहेत. बोअर मारल्यावर वातावरणातील हवा जमिनीत जाते. त्याचबरोबर भूगर्भात दगड तयार होत असतानाची देखील हवा अस्तित्वात असते, ती हवा या दगडात अडकून राहते. बोअर साठी अतिउपसा केल्यामुळे पाण्याची जागा हवा घेते. अर्थात त्या जागी एक प्रकारची पोकळी निर्माण होते. भूगर्भातील दगडामध्ये किंवा भेगांमध्ये हवा अडकून राहिली असते. जेव्हा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते तेव्हा असे आवाज येत असावेत असेही मत प्राध्यापक जाधव यांनी व्यक्त केले.
याबाबत दसरा चौक येथील छत्रपती शहाजी महाविद्यालयाचे माजी उप प्राचार्य आणि भूगोलचे प्राध्यापक एम. टी. पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की,
पृथ्वीचे संतुलन बिघडवण्यासाठी मानवी कार्य कारणीभूत आहे. या बिघडलेल्या संतुलनामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागात भू हालचाली निर्माण होतात या हालचाली निर्माण होत असताना देखील मोठा आवाज येऊ शकतो.
पत्रकार – महेश गंगाराम गावडे