प्रियकर आणि प्रेयसीनो…
घाला एकमेकांच्या गळ्यात गळा
प्रेमाचा फुलवा बहारदार मळा
वैशाख उन्हाच्या कितीही असल्या झळा…
प्रेमात दाखवा आपल्या ना ना कळा…
कोणी आपल्याला पाहिलेच तर…
एकमेकांच्या हातात हात घालून तेथून पळा..
प्रेमात राहताना कटू बोलणे मग टाळा..
एक दुसऱ्यांना लावा असा लळा
लोक म्हणतील तुमचा नादच खुळा..
प्रेमाची भाषा घ्या जरा समजून
होऊ नका निष्ठुर जशी एखादी निश्चल शिळा….
साथीदारांवर भरवशेचा
हृदयातील भिंतीवर मारा असा खिळा….
होऊ नये तो खिळा सैल, कोणी काढता नये उपटून
अतूट आणि अजोड नाते संबंधाचा साजरा करा अवर्णनीय आणि अविश्वसनीय सर्वांग सुंदर असा सोहळा
कवी, पत्रकार महेश गंगाराम गावडे.