साई होम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व ग्रामपंचायत मरळी यांच्यातर्फे मोफत रोग निदान शिबिर
कोल्हापूर, ता. ४ : प्रतिनिधी –
मरळी येथे विनामूल्य रुग्ण तपासणी रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात विविध आजारासंबंधी तज्ञ डॉ. राहुल गणबावले आणि प्रशिक्षित तज्ञांकडून रुग्ण तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
मरळी ग्रामपंचायत व साई होम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तर्फे रोग निदान शिबिर झाले.
या शिबिरात मरळी पंचक्रोशीतील अनेक रुग्णांनी बीपी, शुगर आणि इसीजी या प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या. यावेळी सर्व प्रकारची औषधेही अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली. मरळी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. यासाठी सरपंच सौ. कमल हंबीरराव चौगुले व इतर सदस्यांनी या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.