अविश्वसनीय कथेत गुरफटलेला आणि विश्वासावर आधारलेला *मुंजा* लक्षवेधी
मुंजा चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हॉरर कॉमेडी चित्रपट.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील एक सुंदर गाव. या गावात असणारी वाडी म्हणजे चेटूकवाडी. ही वाडी किल्ला वजा बेटावर असते आणि ती निर्मनुष्य, भीतीदायक असते.
या चित्रपटातील नायक असतो बिट्टू आणि नायिका असते बेला.
बिट्टू याला चेटूकवाडी मधील त्या रहस्यमय झाडाची आणि स्थळाची स्वप्ने पडू लागतात. नायक पुण्यात आई सोबत राहत असतो. त्याचे वडिलोपार्जित घर कोकणात चिपळूण मध्ये असते. तो बेलावर मनोमनी प्रेम करत असतो. पण बेला एका परदेशी युवकांवर प्रेम करत असते. बेला ही बिट्टू याला मित्र मानत असते. बिट्टू याचा एक मित्र विविध इव्हेंटचे शूटिंग करत असतो. एके दिवशी बेलाच्या झुंबा क्लास मध्ये बिट्टू आणि त्याचा मित्र, बेला हे एका शूट साठी गावी जाण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे बिट्टूची आई, आजी असे सर्वजण चिपळुणात जातात. बिट्टू याचा काका हा त्याचा आणि त्याच्या आईचा (मोना सिंगचां) तिरस्कार करत असतो. बिट्टू याच्या वडिलांचा मृत्यू तिच्यामुळे झाल्याचा तो जाहीरपणे बोलत असतो. कारण चेटूकवाडी मधील जागा
बिट्टू याचे वडील विकणार असतात, त्यापूर्वी ते शापित झाड जाळण्यास जात असताना त्यांचा समुद्रात पडून बुडून मृत्यु झालेला असतो.
– एम. जी. गावडे.
क्रमशः