घेताना स्वर्गीय सुखाची अनुभूती, बनू नये स्वत:च्या जीवनाची आहुती..!!!
एच आय व्हीं चा प्रसार असुरक्षित लैंगिक संबंध, संसर्गित सुया व सिरींज,संसर्गित रक्त ,एच आय व्हीं सह जगणाऱ्या मातेकडून होणाऱ्या बाळाला होऊ शकतो .परंतु वैद्यकीय क्षेत्रात होणारे संशोधन व एच आय व्ही विषयी होणाऱ्या जनजागृतीमुळे समाजात होणारा एच आय व्ही प्रसार किंवा लागण कमी होत आहे.
एच आय व्हींवर सध्या कोणती ही लस किंवा रामबाण औषध उपलब्ध नाही. प्रतिबंधात्मक उपचार हाच एक उपाय आहे. प्रामुख्याने
विवाहपूर्व आणि विवाहबाह्य असुरक्षित लैंगिक संबंध या मुळे एच आयव्हींचा प्रसार होतो.
कंडोम किंवा निरोध वापरून
सुरक्षित संबंध ठेवता येतात. मात्र, हे साधन
एचआयव्हींपासून
सुरक्षिततेची किंवा बचावाची शंभर टक्के हमी देऊ शकत नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
एचआयव्हींसह जगणारे व्यक्ती
ए आर टी हे औषध आणि नियमित वापरून तसेच सकस आहार घेऊन सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत
एचआयव्हींसह जगणारे विवाह इच्छुक तरुण आणि तरुणी एकमेकांशी लग्न करू शकतात. त्यांना होणारे अपत्य ही काळजी घेतली तर एच आय वी निगेटिव्ह जन्माला येत आहेत. यामुळे ते सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. या करिता सरकारी पातळीवर तसेच सामाजिक संस्था कडून प्रशंसनीय कार्य होत आहे. मात्र, असे विवाह करताना संबंधितांनी एकमेकांना असणाऱ्या आजाराची माहिती देणे आवश्यक असते. काही वेळेला मात्र सामाजिक भेदभाव आणि कलंकाची भावना याला घाबरून अथवा जाणून बुजून ही माहिती एच आय व्हीं सह जगणाऱ्या तरुणांकडून तर कधी तरुणी हीच्याकडून लपवली जाते. यातील एकजण एचआयव्ही संसर्गित असू शकतो . त्यावेळी फसउन किंवा आपल्या जोडीदार याचा विश्वासघात करून असे विवाह केले जातात. पण यातून भविष्यात अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. घटस्फोट , वादविवाद, निर्माण होतात या ठिकाणी एक उदाहरण देता येईल. एक झोपडपट्टी मधील युवकाने तेथेच राहणाऱ्या उपवर मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या युवकाचा लग्नाआधी अन्य एका जोडीदाराशी शारिरीक संबंध आला होता. त्यातून तो एचआयव्ही बाधित झाला होता. मात्र त्याने ही गोष्ट लपउन ठेवली आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर त्याची पत्नी जेव्हा गरोदर झाली, तेव्हा तपासणीवेळी तिला एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले.
त्यानंतर त्या युवकाने
एआरटी हे औषध बऱ्याचवेळा चुकवले. त्यात त्या युवकाचा मृत्यू झाला.
शेवटी त्या मुलीला
एचआयव्हिसह व विधवा असे जीवन जगावे लागत आहे .
अशी अन्य बरीच उदाहरणे देता येतील. सांगण्याचे तात्पर्य असे की, अलीकडील सोशल मीडिया व अन्य कारणाने सेक्स अडिक्शन झालेली मुले किंवा मुली आपल्या जोडीदार किंवा पार्टनर याचा स्टेटस किंवा त्याच्या बॅक ग्राउंड याबदल माहिती न घेताच
त्याच्या किंवा तिच्यावर अंधविश्वास ठेऊन
शारीरिक आकर्षण मधून असुरक्षित, लैंगिक संबंध ठेवतात. असे संबंध ठेऊन क्षणिक सुखाची अनुभूती मिळवतात, मात्र अशाप्रकारे संबंध ठेऊन ते आपले व आपल्या कुटुंबाचे भवितव्य पणाला लावत असतात. त्याचा किंवा तिचा पार्टनर किंवा जोडीदार त्यांच्याशी विश्वासू, एकनिष्ठ आहे का याचा साधा विचार करत नाहीत आणि हे सेक्स आडीक्शन त्यांना एक दिवस रसातळाला नेते.
जरी भविष्यात एचआयव्ही सह जगणाऱ्या युवक, युवतींनी विवाह केला तरी त्यांचे जीवनमान हे ए आर टी औषधामुळे वाढू शकते. यातील एकाने नियमित औषध न घेतल्यास त्याचा मृत्यू झाल्यास आणि त्याला अपत्ये असल्यास त्याच्या मृत्युनंतर त्यांच्या परिवाराच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याच्या पाठीमागे जिवंत राहणाऱ्या परिवारावर येऊन पडते. अशावेळी संबंधित कुटूबियांची आर्थिक ओढाताण होते, मानसिक संतुलन बिघडते, जीवनमान
खालावते, कुटुंबाला सांभाळण्याचा प्रश्न निर्माण होतो. असे अनेक प्रश्न, समस्या निर्माण होतात. त्यामुळे चुकीच्या वाटेने जाण्यापेक्षा, किंवा चुकीची वाट चोखालण्यापेक्षा त्या वाटेला न गेलेलेच बरे होईल.
अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे. दारू, सिगरेट, मावा, गांजा, ड्रग्ज अशा अमली पदार्थ यांचे व्यसन ती करू लागली आहे. जीवाची मुंबई करू लागली आहे. पुढचा, मागचा विचार न करता वाटेल तशी आणि वाटेल तिकडे भरकटू लागली आहे, अशी ओरड ज्येष्ठ लोकांकडून होऊ लागली आहे. आजकाल मुले लवकर वयात येऊ लागली आहेत. लहान वयातील त्यांच्या गरजा, अपेक्षा वाढू लागल्या आहेत. त्यांची पूर्तता आपल्या पालकांकडून होत नसल्यास ते त्यासाठी जवळचा किंवा पर्यायी मार्ग निवडतात आणि गुन्हेगारीच्या जगात अनाहूतपणे प्रवेश करतात. परिणामी ते स्वतः चे आयुष्य बरबाद करुन घेतात. ज्या युवक, युवतींना असुरक्षित लैंगिक संबंधामुळे एचआयव्हीची लागण झाली आहे, आणि जे आता जीवनाची नव्याने सुरुवात आपल्यासारख्या नवीन जोडीदाराबरोबर करू इच्छितात. ते देखील सर्वसामान्य सारखे जीवन जगू शकतात, आपला संसार थाटू शकतात, सुखी जीवनाची स्वप्ने पाहू शकतात, निरोगी मुल जन्माला घालू शकतात, एकमेकांबरोबर एकत्र राहू शकतात. मात्र…मात्र त्यांच्या सुखाने जगणाऱ्या स्वप्नांना काही मर्यादा आहेत, कार्य क्षमतांची एक हद्द आहे,
एचआयव्हीसह
जीवन जगताना अटी आणि नियमांच्या अधीन राहण्याच एक अपरिहार्य बंधन आहे, भरारी मारण्यासाठी पंखात बळ भरता येणार एआरटी नावाचं इंधन आहे, मात्र त्यालाही एक एक्सपायरी डेट आहे. जीवन जगताना सर्वसामान्य माणूस ज्या तडजोडी करतो, त्रास सहन करतो, त्या प्रमाणे तडजोडी आणि त्रास तर आहेतच शिवाय त्या पेक्षा कितीतरी अधिक आव्हाने आणि संघर्ष या वर्गाच्या वाट्याला आहे. पण म्हणून काय त्यांनी स्वप्न पहायचीच नाहीत, सुखान आणि समाधानान जीवन जगायचं नाही,
असे काही नाही.
एक दिवस एचआयव्ही वर रामबाण औषध उपलब्ध होणार आहे आणि आपणही सर्व सामान्यप्रमाणे जगू, आपल्या मुलांबरोबर आपण ही नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत त्यांच्या सोबत असू अशी अपेक्षा, इच्छा, बाळगायला त्यांना काय हरकत आहे?
असे असले तरी आपल्याला हे जीवन एकदाच मिळते. ते असे वाया जाऊ देऊ नये. कोणत्याही शारीरिक आकर्षण याला बळी पडू नये, आपले आणि दुसऱ्याचे ही जीवन अनमोल आहे. त्या जीवनाची किंमत ज्याने त्याने जाणली पाहिजे. आज आई आणि वडीलांशिवाय असंख्य मुले, मुली एचआयव्ही सह जगत आहेत. ज्यांचे पालक एचआयव्ही मुळे मरण पावले त्या पाल्यांना कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे.
आजारपणामुळे पालकांचा अकाली मृत्यू होतो, त्यामुळे अशा मुलांना एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांच्या अनाथ आश्रमात आसरा घ्यावा लागतो. नेव्हीऱ्यापिन या औषधामुळे ती मुले निकोप जन्माला आली तरी त्यांच्या पालन पोषणावा प्रश्न आ वासून उभा राहतोच राहतोय. त्यामुळे कोणीही चुकीच्या वाटेला जाऊन आपल, आपल्या माणसाचं आणि येणाऱ्या पिढीच नुकसान करून घेऊ नये.
….
लिड
वैद्यकीय क्षेत्रात एचआयव्ही – एड्सवर सध्या तरी कोणतेही रामबाण औषध, लस उपलब्ध नाही. असे असले तरी अजून ही समाजात कधी आपल्या जोडीदार याला फसउन तर कधी प्रेमात धोका देऊन, जाणून बुजून आसुरक्षित शारीरिक संबंध निर्माण केले जात आहेत, आणि ही एक धोक्याची घंटा ठरली आहे. अशा स्वेर वागण्यातून जेव्हा काही वाट चुकलेल्या, पाय घसरलेल्या तरुण, तरुणींना स्वतः ला एचआयव्ही झाल्याचे निदान होते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. काहीजण यातून आपले जीवन ही संपवतात. मग अशा वर्गातील युवक, युवतींना पश्चात्ताप करण्याची वेळ येते. जो दुसऱ्याला कळत किंवा नकळत
एचआयव्हीची देणं देतो, तो किंवा ती आपल जीवन बरबाद करतेच शिवाय दुसऱ्या निरोगी व्यक्तीचं ही जीवन बरबाद करण्यास कारणीभूत ठरते.
समाजात आर्थिक सुबत्ता असलेल्या वर्गापासून, मध्यमवर्ग, आर्थिक मागास आणि दारिद्र रेषेखालील वर्गातूनही अशी उदाहरणे जेव्हा समाजासमोर येतात, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणे अशक्य होऊन बसते. आजकाल युवक, युवती अनेक प्रकारची नशा करतात. मात्र,अशा प्रकारच्या प्रेमाची ही नशा त्यांना त्याच्या सुखी जीवनाचा गाशा कायमचा गुंडाळ्याला लावण्याच्या दिशेने मार्गक्रमन करावयास लावत आहे… या करिता तरुण पिढीने संयम,जोडीदाराशी एकनिष्ठा , कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक बनले आहे …!!!