छत्रपती संभाजी महाराज हे सर्व युवकांचे प्रेरणास्थान
प्रा .ग.गो. प्रधान
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ बलिदान मास पाळला जातो याचे औचित्य साधून महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान या विषयावर शिवव्याख्याते प्राध्यापक ग.गो. प्रधान यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवराव नागोजी वांद्रे साहेब होते सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक प्रधान म्हणाले छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सर्व युवकांसाठी एक प्रेरणास्थान आहे देश आणि धर्मासाठी आपल्या प्राणाची ही बाजी लावणारे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या नंतर मोगलांना आपल्या मावळ्यांच्या साह्याने कडवी झुंज दिली व स्वराज्याचे रक्षण केले संभाजी महाराज हे एक योद्धा उत्तम प्रशासक उत्तम राजनीति तज्ञ कवी लेखक विचारवंत होते. त्यांचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे व आपले ध्येय संभाजी महाराजांसारखे उच्च ठेवून वाटचाल करावी येणाऱ्या संकटावर तुटून पडावे संघर्षाला न डगमगता आपले ध्येय साध्य करावे असा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना केला
या कार्यक्रमाच्या प्रसंगी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी संभाजी महाराजांचा जयघोष केला पोवाडा सादरीकरण केला.
या कार्यक्रमासाठी साठी फार्मसी विभागाचे प्राचार्य सुधीर लंगरे कॅम्पस डायरेक्टर बी एच चौगुले बी एड चे प्राचार्य एन जे कांबळे पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य एस पी गावडे संस्थाप्रतिनिधी अमेय वांद्रे ओ एस सपना देशपांडे इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम शिंदे व आभारप्रदर्शन शंभूराजे लाड यांनी केले.