चंदगड प्रतिनिधी.
महादेवराव बी. एड. कॉलेज तुर्केवाडी मध्ये प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थींचा स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. महादेवराव वांद्रे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सौ. मृणालिनी वांद्रे या होत्या.
“चंदगड व सीमावर्ती भागातील मुलामुलींना शिक्षक होण्यासाठी बी. एड. कॉलेजची स्थापना केलेली आहे. गुणवत्ता प्राप्त केलेले आमचे विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेतून विविध शासकीय नोकरीत रुजू झालेले आहेत. त्यामुळे अद्यापानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा शिक्षक आजच्या स्पर्धेत टिकेल”, असे प्रतिपादन मा. श्री. महादेवराव वांद्रे यांनी केले.
मा. सौ. मृणालिनी वांद्रे यांनी नवागत प्रशिक्षणार्थींचे पुष्प देऊन स्वागत केले व सर्वाना पुढील कालावधीसाठी शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शक प्रा. प्रधान ग. गो. यांनी “कौश्यल्य संपादानाबरोबरच सामाजिक बांधिलकी शिक्षक व्यवसायासाठी असणे महत्वाचे आहे, शिक्षण व प्रशिक्षण यांची सांगड घालून आपल्या सुप्त गुणांचा विकास करावा” असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
कॉलेज चे प्रभारी प्राचार्य श्री एन.जे. कांबळे यांनी नवागतांचे स्वागत केले. “चांगले विचार आणि संस्कार यांना आकार देणेचे काम शिक्षक करत असतो त्यामुळे सर्वांनी अगदी मनापासून या पवित्र पेशाचा स्वीकार करावा असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले”. प्रा. मुल्ला एम.आर., प्रा.पाटील वाय. पी. व्यक्त, भारती मांगले यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी फर्मसी कॉलेज चे प्राचार्य सुधीर लंगरे, कार्यालयीन अधीक्षिका स्वप्ना देशपांडे, प्रा. व्ही. आर. कांबळे, प्रा. अमेय वांद्रे, प्रा. एस.पी. गावडे, श्रीं. दिपाली पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी ममता पाटील यांनी केले, तर आभार अन्नपूर्णा कांबळे यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचेसूत्रसंचालन भक्ती देसाई यांनी केले.