भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाबाबत लोकसभा निवडणुकीत खोटा गैरसमज पसरवून भारतीय जनतेची इंडिया व महाविकास आघाडीने घोर फसवणूक केली आहे. देशातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने कायमच संविधानाचा आदर केला आहे. परंतु, कॉंग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यात भारतीय आरक्षणाबाबत वक्तव्य करून एक प्रकारे भारतीय लोकशाही आणि संविधानाचा अवमान केला आहे. राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका जगजाहीर झाली असून, त्यांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
कॉंग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरात जोडा मारो आंदोलन केले. कोल्हापूर महापालिका परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शिवसेनेच्यावतीने “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष” करीत राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणानी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास ते आरक्षण रद्द करतील, असा गैरप्रचार त्यांनी केला. आता राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्यातून त्यांचा खोटेपणा पुढे आला आहे. गांधी यांनी देशाची आणि देशातील दलित समाजाची माफी मागावी, त्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी खोटा नॅरेटीव्ह निर्माण करण्यात हुशार आहेत. महाराष्ट्रातही मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका दुटप्पी आहे. त्यांचा हा खोटा प्रचार आणि दुटप्पी भूमिका देशातील जनता उघड्या डोळ्याने पाहत असून पुढच्या काळात अशा दुटप्पी आणि फसव्या प्रवृत्तींना जनता योग्य धडा शिकवेल, अशी टीका केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, महिला आघाडी शहरप्रमुख अमरजा पाटील, समन्वयक पूजा भोर, उद्योगसेना शहरप्रमुख मंगलताई कुलकर्णी, पूजा शिंदे, पूजा कामते, सुनिता भोपळे, प्रीती अतिग्रे, राधिका पारखे, पूजा आरदांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाडगे, अॅड.अमोल माने, दीपक चव्हाण, सुनील जाधव, अनुसूचित जाती जमाती सेना जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, विजय जाधव, सनी अतिग्रे, कपिल नाळे, विकास शिरगावे, कुणाल शिंदे, आकाश सांगावकर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.