कोल्हापूर, ता. 15 – (प्रतिनिधी ) चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी येथे 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ झाला. कै गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय , मराठी विद्यामंदिर, ग्रामपंचायत म्हाळेवाडी येथील ध्वजारोहण मान्यवर यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दलित वस्ती साठी 15 टक्के रक्कमेतुन प्रत्येक घरासाठी तांब्याचे वॉटर फिल्टर देण्यात आले. गावातील प्रत्येक घरात सुका कचरा, ओला कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरा कुंड्याच वाटप करण्यात आलं. त्यानंतर ग्राम सभा झाली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी सी. ए. पाटील होते. यावेळी गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच विजय मर्णहोळकर, कल्पना पाटील, अनिता पाटील, तंटामुक्त अध्यक्ष वसंत पाटील, ग्रामसेविका कविता जाधव, एन आर पाटील, रघुनाथ पाटील,पी एस कांबळे, यल्लाप्पा कांबळे, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.