प्रदूषणाचा प्रश्न गहण, यंत्रणेने करावे आता आत्मचिंतन
कोल्हापूर, ता. २८ : (महेश गावडे)
रंकाळा तलाव हा कोल्हापूरची अस्मिता आहे, ते शहराचे वैभव आहे. हे माहीत असूनही रंकाळा तलावाच्या विविध मार्गाने होणाऱ्या जल प्रदूषण मुळे निर्माण होणाऱ्या समस्येकडे ना कोणाचे लक्ष आहे ना, कोणी संवेदनशीलपणे याकडे पाहत आहे, आज रविवारी रंकाळा तलावात मृत होऊन तरंगणारे मासे आणि मेलेला एक गोंडस पक्षी हे विदारक वास्तव आहे.
ज्या प्रमाणे मनुष्य प्राण्याला सुखाने जगण्याचा, मनसोक्त विहार करण्याचा, आनंदाने जगण्याचा जसा अधिकार आहे, तसाच तो मुक्या प्राणी आणि पक्षी यांना देखील आहे. माणूस स्वतच्या अस्तित्वावर, जगण्यावर एखादं संकट आले की जसा जागरूक होऊन आवाज उठवतो, त्यातून हर एक प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रमाणे पक्षी, प्राणी किंवा जलचर यांना मार्ग काढता येत नाही. माणसाप्रमाणे आपल्या हक्क आणि अधिकारासाठी भांडता येत नाही आणि आपली बाजू ही कुठेही मांडता येत नाही. म्हणूनच काही विघ्नसंतोषी, बेजबाबदार, असवेदनशिल नागरिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या त्यांच्या सुखी जीवनाला, त्यांच्या अधिवास याला प्रदुषित करून गालबोट लावत आहेत आणि त्याबद्दल त्यांना कधी ही खंत किंवा खेद वाटत नाही याचेच आश्चर्य वाटते. क्रेशर तलाव आणि त्या आसपासच्या परिसरातून प्रदूषित पाणी रंकाळा तलावात थेट मिसळत आहे. या बद्दल कोल्हापुरातील समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने काही महिन्यापूर्वी आवाज उठवला होता. पण कोल्हापूर महापालिका प्रशासनाने त्यावर काहीच उपाय योजना केलेली दिसत नाहीये. रविवारी २८ जुलै रोजी
रंकाळा चौपाटीवर एक गोंडस राजहंस पक्षी मरून पडला होता. तर रंकाळा तलावात निर्माण झालेल्या जल प्रदूषणामुळे सुमारे ३० ते ४० मासे मृत झाले होते.
हे कशाचे द्योतक आहे, याचा विचार प्रशासन यांनी केला पाहिजे. माणसाचं कसं आहे की, आपल पोट भरल की काहीही होऊ दे, जग पेटू दे, दुसरा दुःखात आहे किंवा अडचणीत आहे, हे माहीत असूनही त्या कडे दुर्लक्ष करून पुढे मार्गक्रमण करत राहायचं एवढंच माहित असत, हा झाला मानवी स्वभाव, याला संवेदनशील लोक मात्र अपवाद आहेत, मात्र अशा लोकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे.
सांगायचं तात्पर्य हेच की रंकाळा तलावावर फिरायला, मज्जा, मस्ती आणि सेल्फी काढण्यासाठी दर रविवारी गर्दी होते. तशी आज ही ती झाली असेल….मात्र, रंकाळा तलावात मेलेल्या मासे यांच्याकडे पाहायला कोणाला वेळ कसा असणार….? आणि ते मासे मेले म्हणून कोण इथ शोक करत बसणार..? नाही का…? आपण आपलं आयुष्य मस्त जगायचं, फिरायच, हुंदाडायच, एन्जॉय करायचं, बाकी काही विचार बीचार डोक्यात घ्यायचा नाही, उघाच डोक्याला शॉट लाऊन घ्यायचा नाही. अशी काहीची प्रवूती असते. या प्रवुती मधून ते बाहेर पडू शकत नाहीत.
कुठे मास्यांचे जेवण केले की अशी माणसे त्यावर तुटून पडतात. मात्र, त्यांना कुठे असे रंकाळा तलावात मासे मृत होऊन पडले तरी त्याचे काही देणे घेणे नसते. खरे तर मासे त्यांचे आवडते खाद्य असते…मांसाहारी माणसाला मासे आवडतात म्हणून तो प्रदूषणामुळे मेलेल्या मासे यांना न्याय देण्यासाठी थोडेच कुणाशी
भांडणार आहे? की आवाज उठवणार आहे..? तो खवव्या आहे, मेजवानीच काम करणार,
प्रदूषणकारी घटकांवर कारवाई करा,अशी मागणी करत थोडेच तो हटून बसणार…?
पण ज्यांच मन संवेदनशील आणि मनस्वी असत, त्यांना मात्र हे चित्र ( मासे मेलेले) पाहिले की दुःख झाल्याशिवाय राहत नाही….हे दुःख, वेद्दना त्यांनाच होतात हे सवेदनशिल असतात. आज अशा संवेदनशील आणि प्राणी मात्रा वर दया करणारे नागरिक यांची समाजाला गरज आहे. की जे आपल्या सहजीवन मधील अत्यावश्यक घटक आहेत. त्यांचं ही एक जग आहे, आणि ते आपल्यापेक्षा फार सुंदर आहे, त्यांनाही प्रदूषणविरहित, मुक्तपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. तो अशा मानव निर्मित प्रदूषणकारी घटकांनी हिरावून घेऊन चालणार नाही, यासाठी आज अशा संवेदनशील कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन रंकाळा तलाव मधील प्रदूषणकारी घटकांवर कारवाई करण्यासाठी आणि प्रदूषणकारी स्त्रोत्र कायमचे बंद करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकु शकतील. पण हे मनात आणले तरच शक्य आहे. राजकीय नेते असोत वा व्यवस्थेतील घटक यांनी ही आपली नैतिक जबाबदारी पार पाडायला हवीय.
खरे तर रंकाळा परिसरातील मत्स्य संपदा मृतप्राय होते आहे, रंकाळा सुशोभीकरण यावर पाण्या सारखा पैसा खर्च करणारी यंत्रणा रंकाळा तलावाच्या प्रदूषणाला थांबवू शकत नाही, ती हतबल आहे. ना ती रंकाळा तलावात प्रदूषित पाणी सोडणाऱ्या घटकावर कारवाई करू शकते ना ती उपाय योजना राबवू शकते…या पैकी ती आज दुर्दैवाने काहीही करू शकत नाही.
ही यंत्रणा कोणाच्या दावणीला बांधली आहे का, असाही प्रश्न आज रंकाळा प्रेमी उपस्थित करत आहेत. आज बरेच मासे मेले, एक गोंडस पक्षी मेला, याचे कोणाला सोयर सुतक नाहीये. हे जलचर किंवा उभयचर प्राणी, पक्षी मेले म्हणून आपल्या दैनंदिन जीवनावर काडीमात्र परिणाम होणार नाही, आणि तो का व्हावा, हा प्रश्न आहे, आणि याचे उत्तर आज नेमके कोण देऊ शकेल.. हा ही एक यक्ष प्रश्न ठरलाय.
आज रंकाळा तलावातील एक गोंडस पक्षी मेला म्हणून कोणी शोक व्यक्त करणार नाही, आणि केलाच तर तो काही क्षणापुरताच असेल.
आज या तलावातील मासे मेले म्हणून कोणी रंकाळा तलावातील मासे खायचे सोडून देणार नाही. आपल देणं घेणं केवळ मानवी जीवना पुरतं मर्यादित आणि लिमिटेड झालं आहे.
कोण आपली पर्वा करत नाही तर आपण जगाची, जगातील दुर्बल, वंचित घटक, निसर्ग, निसर्गातील प्राणी, पक्षी, जलचार, त्यांचा अधिवास यांची का पर्वा करावी, हा विचार नाही अविचार आहे. जो पर्यंत आपण दुसऱ्याचं जगणं ही तितकच महत्वाचं मानत नाही, जितकं स्वतःच तो पर्यंत जगात नाही आपल्या जीवनात काहीतरी चांगला आणि सकारात्मक बदल याची अपेक्षा ही बाळगून चालणार नाही, याची खूणगाठ बांधून ठेवावी.
पक्षी असो बा मासे त्यांनाही दुःख होत, वेदना होतात ..पण आपण डोळे असूनही ते बंद करून ठेवले आहेत. मन असूनही त्याला दगड बनवले आहे. जो पर्यंत आपण खऱ्या अर्थाने माणसात येणार नाही, तो पर्यंत आपण मनस्वी
माणूस बनणार नाही. असे म्हटले तर ते गैर ठरणार नाही.
रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न हा आजचा नाही. ती फार वर्षांपासूनचा आहे आणि विकासाच्या वेडगळ कल्पना राबविणाऱ्या तथाकथित धोरणकर्ते यांना हा प्रश्न, समस्या म्हणून दिसत नाही का…? रंकाळा तलावात मासे पाण्यातील ऑक्सीजन कमी झाल्यामुळे मरत आहेत. सांडपाणी मिसळणे, कपडे धुणे, जनावरे धुणे,अंघोळ करणे सुरूच आहे आणि खरे तर हे अनिर्बंध आहे. यंत्रणा आणि धोरणकर्ते यांनीच याबाबत कठोर कारवाई आता करण्याची गरज आहे, असे रंकाळा प्रेमिजन बोलत आहेत.