जांयटस् ग्रुप आँफ रंकाळा चाैपाटी या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ येथील अंध शाळा येथे ५५अंध मुला-मुलींना जेवण आणि लाडु, केळी देण्यात आली. या उपक्रमास साक्षी विकास कांबळे हिचे माेलाचे सहकार्य मिळाले. तसेच लक्ष्मीपुरी काेंडाओळ येथे वृक्षाराेपण व संवर्धनासाठी विविध जातीची राेपे संवर्धनासाठी ५० राेपे साै सुरेखा डवर -समाज कल्याण विभाग -तालुका काेआँर्डीनेटर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी सुरेखा डवर यांनी विविध शासकीय याेजंनाचे फार्म व माहीती लाेकांपर्यत पाेहचण्यासाठी मार्गदर्शन केले व जायंटस् ग्रुप आँफ रंकाळा चाैपाटीच्या विविध उपक्रमाचे काैतुकही केले. या सर्व कार्यक्रमास बबीता जाधव-संस्थापक , माधुरी भाेसले–पाटील -अध्यक्षा,अनिता काळे-उपाध्याक्षा,कमल पाटील-कार्यवाह, शशीकांत कुलकर्णी-खजिनदार, राजाराम मटकर,लक्ष्मी माळी,शारदा चेट्टी, संजय कुलकर्णी,प्रा.तानाजी पाटील,संगीता राठाेर,उदय माळी, किर्तीकुमार जाधव इ.सभासद उपस्थित हाेते.