विशालकाय उल्का पिंड पृथ्वीला धडकणार की तिची दिशा बदलण्यात यश येणार…?
नासा, इस्त्रो एकत्र येऊन मार्ग काढणार…., अरिष्ट टळणार..?
पृथ्वीच्या दिशेने येत आहे उका पिंड : 13 एप्रिल 2029 तारीख नक्की..?
कोल्हापूर, ता. 23- (महेश गावडे)
तसे पाहायला गेले तर पृथ्वीच्या अंताची तारीख काही भविष्यवेते यांनी आधीच लिहून ठेवली आहे. नोस्त्रेडय्यामस यांच्यासारख्या भविष्यवेत्यानी सांगितलेल्या बऱ्याच भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.
विविध संकट पृथ्वीवर येतील आणि त्यामुळे पृथ्वीवर संकटाची मालिका सुरू होईल, असेही सांगण्यात आले आहे. आता एक नवीन संकट पृथ्वीच्या दिशेने येत आहे. 13 एप्रिल 2029 रोजी एक विशाल काय उल्का पिंड पृथ्वीला धडकण्याची शक्यता वैज्ञानिकांकडून वर्तवण्यात आली आहे.
असं म्हणतात की उल्कापिंड जिथे पडते तेथील सर्व भाग नामशेष होतो. त्यामुळे अमेरिकेची नासा स्पेस एजन्सी या उल्का पिंडची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार एक विशाल काय उल्का पिंड रॉकेटच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. जर ही उल्कापिंड पृथ्वीवर धडकली तर मोठी नुकसानदायी बाब किंवा पृथ्वीची प्रचंड हानी करणारी ठरू शकते. परिणामी मानव जातीवर येणार ते भयावह संकट असू शकते. काही वैज्ञानिकांनी या संकटाला मिस्त्रच्या सर्वात मोठ्या राक्षसांचा देवता ऑफ्फाफिसच्या वरून नाव ठेवले आहे. यामुळे अमेरिकेची नासा, भारताची इस्त्रो आणि युरोपची स्पेस एजन्सी
इ एस ए यांच्याही चिंतेत भर पडली आहे.
यापूर्वी एक उल्का पिंड 116 वर्षांपूर्वी, 30 जून 1908 रोजी सायबेरिया मधल्या तुंगुस्का या ठिकाणी पडली होती. त्यावेळी एवढा प्रचंड मोठा विस्फोट झाला होता की, 2200 वर्ग घनमीटरचे जंगल एका क्षणात जळून खाक झाले होते.
साधारण 6.6 करोड वर्षांपूर्वी अशीच एक उल्कापिंड पृथ्वीवर कोसळली होती. या उल्कापिंडमुळे दहा अरब परमाणू बॉम्ब फुटण्याने जेवढी हानी होते, तेव्हढी हानी झाली होती. आकाशातून ॲसिड सारख्या रसायनाचा पाऊस पडत होता. समुद्र मधून काही किलोमीटर अंतरापर्यंत उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे निर्माण झालेल्या सुनामीने अर्ध्या पृथ्वीला आपल्या कवेत घेतले होते. वातावरणात धूर आणि राखेमुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.
आता अशीच एक उल्का पिंड 13 एप्रिल 2029 रोजी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. अर्थात, ही उल्का पिंड पृथ्वीपासून सर्वात जवळ असणार आहे. पृथ्वीपासून ती सुमारे 32 हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. उल्का पिंड पृथ्वीवरील वातावरणात धडकली तर काय होणार, या चिंतेने वैज्ञानिकांना ग्रासले आहे. कदाचित असे झाल्यास पृथ्वीवरील फार मोठा हिस्सा प्रभावित होण्याची शक्यता आहे किंवा पृथ्वीच्या फिरण्याच्या चक्रामध्ये मोठा बदल होऊ शकतो, असेही म्हटले जात आहे.
येत्या पाच वर्षांनी येणाऱ्या या संकटामुळे वैज्ञानिक, शास्त्रज्ञ देखील टेन्शनमध्ये आले आहेत. सर्वसाधारणपणे उल्का पिंड दुसऱ्या ग्रहाच्या तुलनेत फार छोट्या आकाराच्या असतात. जी उल्का पिंड पृथ्वीच्या दिशेने येत आहे तिचा आकार 375 मीटर इतका रुंद आहे.
जर ही उल्कापिंड पृथ्वीवर कोसळली तर पूर्वी जिथून पृथ्वीवर मानवाची, मानवी जीवनाची सुरुवात झाली होती, त्याच ठिकाणी पूर्व पदावर येऊन पृथ्वी पोहोचेल, अशी भीती आहे. अशी एखादी उल्कपिंड धडकली तर एक हजार किलोमीटर अंतराच्या चारी दिशा पर्यंत सर्व भाग नामशेष होऊ शकतो.
शेकडो वर्षांपूर्वी उल्कापिंड पृथ्वीवर धडकल्याने डायनासोर सारखे महाकाय प्राणी यांचे नामोनिशाण मिटलं होतं. आता पाच वर्षांनी पुन्हा एक उल्का पिंड रॉकेटच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे आणि समस्त मानव जातीसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.
काही उल्का पिंड एवढ्या मोठ्या असतात की त्या पृथ्वीला नामशेष करू शकतात. 2029 मध्ये येणारे संकट असेच अस्मानी आणि सुलतानी आहे. खरं म्हणजे दरवर्षी सतरा हजार उल्का पिंड या पृथ्वीवर कोसळतात. या उल्का पिंडचे वजन 50 ग्रॅम ते दहा किलोच्या दरम्यान असू शकते.
पाच वर्षांमध्ये हे संकट मानव जातीवर येणार असल्यामुळे जगातील सर्व नागरिकांचे लक्ष अंतराळ स्पेस एजन्सी यांच्याकडे लागून राहिले आहे. या उल्का पिंडीला पृथ्वीच्या कक्षात किंवा पृथ्वीला धडकण्यापूर्वीच नामशेष करणे शक्य नाही, असे बोलले जात आहे. मात्र त्याचवेळी या उल्का पिंडीची दिशा बदलता येऊ शकते, यावर मात्र या क्षेत्रातील तज्ञांचे एकमत आहे. कारण 2022 मध्ये नासाने एका मिशन अंतर्गत एका उल्कापिंडीची दिशा आहे बदलली होती. या उल्कापिंडीचा, संकटाचा सामना करण्यासाठी नासा, इस्त्रो आणि इ एस ए या अंतराळ एजन्सी काम करत आहेत. मानवजातीला वाचण्यासाठी, या मिशनसाठी ते एकत्र येतीलही.