पृथ्वीचा पृष्ठभाग आणि आतला भाग हे दोन्ही एकमेकांच्या उलट किंवा विरुद्ध दिशेने फिरत आहेत, असे काही संशोधकांना वाटत आहे.
पृथ्वीच्या गाभ्याचा वेग कमी झाल्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. मात्र, याबाबत संशोधकांमध्ये मतमतांतरे दिसून येतात.
पृथ्वीचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे पाच हजार किलोमीटर खोल आहे. त्यापैकी बारा किलोमीटर खोल पर्यंतचीच माहिती उपलब्ध आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाबाबत बरेच संशोधन झाले आहे. मात्र पृथ्वीचा गाभा हा वेगळा विषय आहे, असे संशोधकांना वाटते.
दरम्यान, कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी एक शोध नुकताच लावला आहे. पृथ्वीचा गाभा हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत विरुद्ध दिशेला फिरतोय. पृथ्वीच्या गाभ्याचा परिवलनाचा वेग गेल्या 14 वर्षांपासून कमी झाला आहे. या परस्परविरोधी दिशांना फिरण्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल, या बाबत काही मत मतांतरे आहेत. तसे पाहायला गेले तर पृथ्वीचे बाह्य कवच, प्रावरण आणि गाभा असे तीन भाग पडतात. याबाबत पूर्वी देखील संशोधन झाले आहे. त्यानुसार एक संशोधन सांगते की, गाभा पृथ्वीच्या इतर भागापासून वेगळा आहे. तो पृथ्वीपासून एका द्रवामुळे वेगळा झाला आहे आणि त्याचे काम स्वतंत्ररित्या चालते आहे. मात्र, अलीकडचा अभ्यास या संशोधनाला छेद देणारा आहे, असे वाटते. या अभ्यासानुसार गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच हा गाभा पृथ्वीच्या बाह्यकवचाच्या विरुद्ध बाजूला फिरत आहे आणि प्रावरणापेक्षा कमी वेगाने फिरत आहे.
याबाबत प्रोफेसर वेंकटेश्वरन यांनी आपले अभ्यासपूर्ण मत नोंदवले आहे.
त्यांच्या मते आपण पाच हजार किलोमीटर इतक्या खोलीपर्यंत जाऊ शकत नाही. भूकंप लहरीच्या माहितीवरून वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, हा वेग कमी झाला आहे. ते भविष्यात बदलू शकते. पृथ्वीच्या गाभ्याचा वेग कमी झाल्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. या गाभ्यातील लोखंड आणि निकेलं याचा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या वेगावर परिणाम झाला तर पृथ्वीच्या बाह्य कवचावरही परिणाम होऊ शकतो.
जेव्हा पृथ्वीचे परिभ्रमण होतं, तेव्हा गाभ्याच्या आत असलेल्या धातूंचही परिभ्रमण होत असतं. यामुळे पृथ्वीच्या आजूबाजूला चुंबकीय दाब तयार होतो, त्यालाच चुंबकीय क्षेत्र म्हणतात. चुंबकीय क्षेत्रातील लहरीमुळे पृथ्वीचे सूर्यापासून रक्षण होते. पण त्याचवेळी पृथ्वीच्या कक्षेतील बदलामुळे चुंबकीय क्षेत्रातही बदल होऊ शकतो. परिणामी दिवसाची लांबी ठरवण्यात चुंबकीय क्षेत्राचाही महत्त्वाचा हिस्सा आहे. हे जर लक्षात घेतले तर दिवसात एका मायक्रो सेकंदाचा परिणाम होऊ शकतो, याबाबत विस्तृत संशोधन होणे आवश्यक आहे, असेही प्रोफेसर व्यंकटेश्वरन यांचे म्हणणे आहे.
……..
आतील गाभा:
पृथ्वीचा सर्वात आतील भाग हा गाभा आहे आणि त्याची जाडी सुमारे १५०० मैल (२४१४ किमी) आहे. आतील आणि बाहेरील दोन्ही कोर प्रामुख्याने लोह आणि निकेलचे असतात. ते अत्यंत उष्ण आहेत.
आले आहे.