कोल्हापूर, शाहूवाडी ता..21- (प्रतिनिधी )
कोल्हापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गवरील
मलकापूर ते आंबा मार्गावर पावसाचे पाणी आले आहे. सायंकाळी
घोलसवडे रस्त्यावर पाणी आल्याने काही विद्यार्थी आणि त्यांचे पालक पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले होते.
दरम्यान, या
राष्ट्रीय महामार्गचे काम सध्या सुरू आहे. मात्र या मार्गावर टाकलेल्या या भरावामुळे पावसाचा जोर असाच वाढल्यास समस्या निर्माण होऊ शकते. या रस्त्याची उंची वाढवण्यात येत आहे.
घोलसवडे रस्ता रविवारी सायंकाळी पाण्याखाली गेल्याने
शाळकरी मुले अडकून पडली आहेत. तर त्यांच्या सोबत असणारे त्यांचे पालक ही चिंतेत आहेत. त्यांनी आपल्या घराकडे जायचे कसे असा प्रश्न पडला होता.
शाहूवाडीतील लव्हाल मार्गावर सायंकाळी 5 वाजता पाणी आले होते. पावसाचा जोर असाच वाढल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होण्याचा धोका संभवत आहे.