संशोधकांनी केला विविध पृष्ठभागांचा अभ्यास: धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर, ता. 21 – समाज धन टाइम्स (प्रतिनिधी)
तुमच्या पाण्याच्या बाटलीमध्ये शौचालयामध्ये आढलनाऱ्या जंतूपेक्षा जास्त जंतू असू शकतात, संशोधकांनी याचा नुकताच एक अभ्यास केला आहे. ब्राझिलियन सोसायटी ऑफ इनफेस्वाज डिसीजेस या संस्थेच्या सल्लागार डॉ. रॉड्रिगो लिंस यांच्या मते, बाटलीत पाणी भरण्यापूर्वी आपण काही सेकंद पाणी नळाखाली धरतो. पण पाण्याची बाटली व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर जिवाणू आणि बुरशींसारखे सूक्ष्मजीव बाटलीत जमा होऊ शकतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरू शकतात. याबाबत पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास करणाऱ्या वॉटर फिल्टर गुरु या कंपनीने सविस्तर अभ्यास केला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार पुन्हा पुन्हा वापरात आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत सुमारे २.८ कोलनी फॉर्मिंग युनिट अर्थात
सी एफ यु हे असतात.
सी एफ यु हे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर किती प्रमाणात सूक्ष्मजीव आपली संख्या वाढू शकतात हे मोजण्याचे परिमाण आहे.
संशोधकांनी विविध पृष्ठभागांचा अभ्यास केला. त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार टॉयलेटच्या पृष्ठभागांवर सरासरी 515 सी एफ यू होते. याचाच अर्थ पाण्याच्या बाटलीत टॉयलेट सीटपेक्षा चाळीस हजार पट जास्त जिवाणू होते. पाळीव प्राण्यांना अन्न देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांवर सरासरी 14 लाख सी एफ यु सापडले. तर कम्प्युटर माऊसवर 40 लाख
सी एफ यु दिसले. तसेच स्वयंपाक घरातील सिंक वर 1.1 कोटी
सी एफ यु दिसले आहेत.
तज्ञांच्या मते या सूक्ष्मजीवांमुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो. बाटलीतील सूक्ष्मजीवांची संख्या जेव्हा जास्त असते, तेव्हा त्या बाटलीचा नियमित वापर करणाऱ्या व्यक्तीला मळमळ, उलटी अशी लक्षणे जानऊ शकतात. तर कोणाला बुरशीची ऍलर्जी असेल तर सूक्ष्मजीवांनी भरलेल्या बाटलीमुळे नाक चोंदने, नाक वाहणे आणि मळमळ, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवू शकतात.
साव पावलो विद्यापीठामध्ये बायोमेडिकल विभागात मायक्रोबायोलॉजिस्ट असणारे जॉर्ज टीमनेस्की यांच्या मते, काही जणांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा व्यक्तींवर या सूक्ष्मजीवांचा परिणाम होतो.
त्यामुळे ज्या वस्तू आपण नियमितपणे वापरतो, त्याच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे ही तितकेच गरजेचे आहे. आपली पाण्याची बाटली इतरांना देऊ नये तसेच त्यामध्ये फळांचा रस किंवा कोल्ड्रिंक्स यासाठीही त्याचा वापर करू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.