कोसळधारेने कोल्हापूर शहर परिसरात आठ झाडे कोसळली , अग्निशमन दलाची झाडाझडती अन् धावपळही उडाली…
कोल्हापूर, ता. १९ (प्रतिनिधी)
कोल्हापूर शहर आणि परिसरात शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे चार ते पाच ठिकाणी झाड घुसळून दोन गाड्यांचे नुकसान झाले. मात्र या घटनेत सुदैवाने जीवित हानी मात्र झालेली नाही.
शुक्रवारी सकाळपासून शहर, परिसरात पावसाची रिप रिप सुरूच आहे. काही वेळ उघडीप देऊन पुन्हा पाऊस हजेरी लावत होता. दिवसभर पडलेल्या या पावसामुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात ठिकठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली.
या मध्ये आर टी ओ मार्गावर एक झाड कोसळून एका दुचाकीचे नुकसान झाले तर पाच बंगला येथे एक झाड चार चाकी गाडीवर कोसल्याने गाडीचे नुकसान झाले.
के एम टी वर्कशॉप , एस एम सी बोर्ड जवळ आणि शाहूपुरी जिमखाना या ठिकाणी देखील झाड पडल्याची घटना घडली आहे. मात्र या तिन्ही घटनेत काही नुकसान झाले नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी समाज धन टाइम्सशी बोलताना दिली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आठ झाडे पडल्याची घटना घडली.