आपली आकाश गंगा विविध रहस्यांनी भरलेली आहे. आकाशगंगा मधील विविध नवनवीन ग्रह, तारे यांचा शोध लागत आहे. अलीकडेच भारताने चंद्रावर संशोधनासाठी चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग करून जगाचे लक्ष वेधले होते.
माणसाचं पृथ्वीवरच आयुष्य हे गुहेपासून सुरू झालं होतं असं म्हणतात. आता माणसांच्या चंद्रावरच्या मुक्कामाची सुरुवात देखील कदाचित गुहेपासून होण्याची शक्यता आहे. कारण इटली युनिव्हर्सिटी मधील दोन संशोधकांनी चंद्रावरच्या गुहेचा शोध लावला आहे. अर्थात चंद्रावर पहिल्यांदाच गुहा सापडली आहे.येत्या सुमारे तीस वर्षांमध्ये माणूस चंद्रावरील गुहेत कदाचित राहत असेल असेही या वैज्ञानिकांनी मत नोंदवले आहे.
चंद्रावरील हे संशोधन नेचर एस्ट्रॉनॉमी या विज्ञान विषयक जनरल मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
इटली युनिव्हर्सिटी ऑफ
ट्रॅनटो मधल्या लॉरेनझो बुरुझन आणि लिओनर्डो कॅरेन या दोघानी याचा शोध लावलाय. चंद्रावरच्या मारे
ट्रेनकुली टॉरटस अर्थात सी ऑफ ट्रेनकुली या चंद्रावरच्या खडकाळ भागामध्ये मारे म्हणजे समुद्र. या जागेवर एकेकाळी समुद्र होता, असे या संशोधकांचे निरीक्षण सांगते. या संशोधकांनी रडारच्या मदतीने या गुहेचा वेध घेतला आहे.
ही जागा पृथ्वीवरून सुद्धा दिसू शकते.
याच मारे
ट्रेनकुली टॉरटस मध्ये या गुहेचे तोंड उघडते हे मुख चंद्रावरच्या पृष्ठभागावर आहे.
आणि या जागेवर 1969 मध्ये नासाचे अपोलो 11 हे यान उतरवले होते.
या गुहेची खोली सुमारे 170 मीटर इतकी खोल असल्याची शक्यता आहे.
चंद्रावर अब्जावधी वर्षांपूर्वी लाव्हा वाहिला त्याने तेथील खडकात बोगदे तयार झाले. आणि त्याचवेळी ही गुहा निर्माण झाल्याची देखील शक्यता आहे.
पृथ्वीवर देखील ज्वालामुखीमुळे गुहा तयार झाली आहे. चंद्रावरील या गुहेचे साधर्म्य संशोधकांना स्पेन देशातल्या एका गुहेची आढळले आहे.
तसे पाहायला गेले तर चंद्रावर गुहा आहेत याचा अंदाज सुमारे पन्नास वर्षांपूर्वी संशोधकांना आला होता. सन 2010 साली लूनार रेक्सीनान या मिशनने काही विवरांचे दृश्यही टिपले होते. हे खड्डे तेव्हा गुहेची मूख असल्याचे वैज्ञानिकांना वाटले होते.
येत्या सुमारे तीस वर्षांमध्ये माणूस चंद्रावरील गुहेत कदाचित राहत असेल असेही या वैज्ञानिकांना वाटत आहे. अर्थात चंद्रावर न सापडलेल्या अशा शेकडो भूमिगत गुहा देखील असू शकतात.
याबाबतचे अजून संशोधन होणे बाकी आहे.
यापूर्वी विविध संशोधकांनी चंद्रावरचा अभ्यास करण्यासाठी अथवा तेथील इतिहास उलगडण्यासाठी चंद्रावरच्या पृष्ठभागावरील माती नमुने दगडाचे नमुने गोळा केले आहेत. आता या दोघा संशोधकांनी केलेल्या संशोधनामुळे मंगळावरील असणाऱ्या गुहेचा देखील शोध घेण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळ उभारण्यासाठी सध्या विविध देशात स्पर्धा लागलेली पाहायला मिळत आहे. असे असले तरी या ठिकाणी जाणाऱ्या अंतराळवीरांना रेडिएशन, तेथील वातावरणातील तापमान जन अशा वेगवेगळ्या धोक्यांपासून किंवा गोष्टींपासून संरक्षण द्यावे लागणार आहे.
दरम्यान, भारताने चंद्रावर संशोधनासाठी चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग करून अंतराळ संशोधनात करारी भरारी घेतली आहे. या संशोधनामुळे बहुचर्चित पर ग्रहवाशी यांचा शोध घेण्यास ही मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी झाले.
लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरले.
या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा देश बनण्याचा मान मिळवला आहे.