विशाळगडावर झालेला प्रकार हा चुकीचा आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात असे प्रकार होणे ही दुर्दैवाची बाब आहे, असे सांगत विशाळगडावर निष्पाप लोकांना नाहक त्रास देऊन त्यांची मालमत्ता नुकसानीस जबाबदार असणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, विशाळगडावरील मालमत्तेचे २ कोटी ८५ लाख इतके नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून याबाबतचा अहवाल शासनाला पाठवला आहे, असेही त्यांनी सांगितले.
विशाळगडावर रविवारी काही समाज कंटकांनी तेथील लोकांच्या मालमत्तेची हानी केली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात इंडिया आघाडी आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी श्री. येडगे यांनी संवाद साधला.
विशाळगड वरील अतिक्रमण प्रष्नी डिसेंबर २०२३ मध्ये बैठक झाली. जून २०२३ मध्ये याबाबत कोर्टात स्थगितीचां आदेश होता. ही स्थगिती उठउन हे अतिक्रमण काढण्यात येणार होते. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू केली होती.
मात्र, विशाळगडवर झालेली घटना चुकीची आहे. प्रशासन यांनी त्यावेळी उद्भवलेली परिस्तिथी योग्य रीतीने हाताळली. दोन वेगवेगळे जमाव वेगवेगळ्या वेळी आले. यावेळी गडावर हे लोक जाऊ न देणे हे पाहणे महत्वाचे होते.
दरम्यान, तिथे झालेली घटना चुकीची असून सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे हे महत्वाचे आहे. विशाळगडावर ज्यांचे घर, दुचाकी, चार चाकी यासारख्या वस्तूंचे नुकसान झाले, त्या नुकसानीचा पंचनामा केला असून २ कोटी ८५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठवला आहे. तेथील लोकांना मदत करणे ही प्राथमिकता राहणार आहे, असे ही जिल्हाधिकारी यांनी नमूद केले.
….
इंडिया आघाडीने लक्ष वेधले… घटनेमागील सूत्रधार यांच्यावरही कारवाई करण्याची केली मागणी….
दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला खासदार शाहू महाराज, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महादेवराव आडगुळे, वही. बी. पाटील, आर. के. पवार, बाबा इंदुलकर, मेघा पानसरे, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फाँडे, गणी आजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी विशाळगडावर निष्पाप लोकांना आणि त्यांच्या घरावर हलां करून त्यांना लक्ष केले गेले, त्याचा इंडिया आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या घटनेचे व्हिडिओ तपासून यातील दोषींवर आणि यामागील सूत्रधार यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या हल्यात तेथील महिला जंगलात पळून गेल्या. तिथे दहशत पसरवण्यात आली. झालेल्या घटनेत जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या पायाला लागले असे म्हणतात, पण त्यांनी एका ही दोषी ला अटक कशी केली नाही, ही लोकशाही आहे की हुकूमशाही असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला.
प्रशासन यांनी याप्रकरणी किती जणांना अटक केली, तेथील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. काही महिलांना अंगावर घालायला कपडे नाहीत, झोपायला व्यवस्थित जागा नाही, घरात शिधा नाही, त्यामुळे त्यांना जेवण आणि कपडे देऊन मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना तिथे मदत देण्यासाठी जाणाऱ्यांना अटकाव करू नये, असेही सतेज पाटील यांनी बोलून दाखवले.
ज्यांच्यावर हल्ला करून नुकसान केले आहे, त्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली, याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, याचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे आश्वासन अमोल येडगे यांनी दिले.
विशाळगड घटनेमुळे इतर ठिकाणी पडसाद उमटू नयेत, यासाठी तालुक्यात शांतता बैठक घेण्यात येणार आहेत, संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल,असेही जिल्हाधिकारी म्हणाले.