कोल्हापुरात एक गाढली गेलेली मेहतर समाजाची स्मशानभूमी आणि त्या खाली गाढले गेलेल्या एका मृताचे आत्मकथन
आम्ही इथे जमिनी खाली दफन आहोत. अनेक वर्ष झाली. पण एका ओढ्यालगतची जागा आमच्या नशिबी आली. तरीही आमच्या सग्या सोयरे यांनी कोणतीही तक्रार न करता आमच्या मृत्यू नंतर आम्हाला इथे दफन केले. आम्ही मृत्यू नंतर इथे निपचित पडलो आहोत. मात्र, मृत्युनंतर आमची एक प्रकारची विटंबना थांबलेली नाहीये. कारण या स्मशान भूमीलाच आता दफन करून तिला नामशेष करण्याचा घाट घातला जात आहे. आमच्या स्मशान भूमीच अस्तित्व संपवलं जातंय. याच कोणाला आता सोयर सुतक राहिलेलं नाहीये. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील मृत व्यक्तींना देखील दफन केलं जात. तिथे त्या त्या समाजासाठी दिलेल्या हक्काच्या जागेत त्यांचे नातलग जाऊन थडग्यावर किंवा
स्मृति स्तंभसमोर जाऊन
स्मृति दिनानिमित्त त्या जागेवर फुल चढवतात, स्मरण करतात. काहीजण आमच्या या जगातून निघून जाण्याने तिथं अश्रू ढालतात. पण..पण आमचे काय…? या जगातून निघून गेल्यावर देखील आमचे सगे सोयरे आम्हाला भेटायला येऊ शकत नाहीत, आमच्या आठवणीन आणि स्मृतींनी त्यांना किती छळलं तरी ते आमच्याकडे येऊ शकत नाहीत. कारण आम्हीं आता अडगळीत पडलो आहोत. जगाच्या दृष्टीने आमचा विषय आता संपलाय.
असे म्हणतात की मृत्युनंतर ही आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घ्यावा लागतो. त्यांच्या ही काही अतृप्त इच्छा असतात. काहीं जण आपल्या कुटुंबातील मृत व्यकीच्या निधनानंतर
वर्ष श्राद्ध घालतात, ते याचमुळे. पण आम्ही मात्र दुर्दैवी ठरलो आहोत. इथे आम्हाला दफन भूमी मिळाली हे खर आहे. मात्र ती आता पूर्णपणे मातीच्या प्रचंड
डीगार्याखाली गाडली गेली आहे. आम्ही, (आमची स्मशान भुमीच) गाढलो गेलो असल्याने आमची घुसमट होत आहे. आम्ही
मृत पावलो असलो तरी या भूमीच्या गर्भातून आमचे आक्रंदन सुरू आहे. ती कुणाच्या कानी पोहोचत आहे की नाही, हे समजायला मार्ग नाही.
कोल्हापूर मधील लक्ष्मीपुरी, सुतार वाडा भागातून जयंती नाला वाहतो. या नाल्या जवळ अनेक वर्षापासून मेहतर समाजाची स्मशानभूमी आहे. मात्र, अलीकडच्या काळात ही स्मशानभूमी नामशेष होत चालली आहे. मेहतर समाजातील एका मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं हे आत्मकथन खरच मन हेलावून टाकणारे आहे.