कोल्हापूर शहराच्या हदवाढ विरोधात प्रस्तावित १९ गावांनी एल्गार पुकारला आहे. त्यानुसार आज 14 जुलै रोजी संबंधित 19 गावांनी जवळपास सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, हतावरचे पोट असणाऱ्या घटकाला याचा काही प्रमाणात याचा फटका बसला. या बंदमध्ये गांधीनगर बरोबर शिरोली एमआयडीसी आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसी या दोन्ही औद्योगिक वसाहतीचां समावेश असल्याने या १९ गावात मिळून सुमारे १ हजार कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर महापालिका हदवाढ विरोधी समिती यांनी संबंधित गावांना एक दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हदवाढमध्ये शिरोली, नागाव, वळीवडे- गांधीनगर मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फे ठाणे, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिंगणापूर, नागदेववाडी,कंदलगाव, तर औद्योगिक वसाहतीमध्ये शिरोली एमआयडीसी आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसी यांचा समावेश आहे.
या 19 गावांचाही कोल्हापूर शहराच्या हदवाढमध्ये येण्यास विरोध आहे आणि आंदोलनाला त्यांचा पाठिंबा मिळाला. त्या नुसार पाचगाव, गोकुळशिरगाव अशा एकूण १९ गावातील वेगवेगळ्या आस्थापना, दुकाने यांनी आपली दुकाने बंद करून या बंदला पाठिंबा दिला.
दरम्यान, ज्यांचे हातावरच पोट आहे, आज काम केल्याशिवाय ज्यांच्या घरातील चुल पेटत नाही, त्यांना अशा वर्गाला काही प्रमाणात याचा फटका बसला. कारण या बाजारपेठेवर त्यांचा चरितार्थ चालतो.
वळीवडे- गांधीनगर या सह शिरोली एमआयडीसी आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसी या दोन्ही औद्योगिक वसाहतीचां यात समावेश असल्याने सुमारे १ हजार कोटींची उलाढाल थंडावली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रस्तावित कोल्हापूर हद्दवाढ विरोधात आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या निमित्ताने आंदोलक यांच्याकडून देण्यात आला आहे.