जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे वारांगना सखी संघटनेला आश्वासन
सेक्स वर्कर यांच्या पुनर्वसन प्रश्नी वारांगना सखी संघटनेने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
कोल्हापूर, ता. १२ – (समाज धन टाइम्स प्रतिनिधी) कोल्हापूर मधील सेक्स वर्कर यांच्या उदरनिर्वाहबरोबर पुनर्वसनाचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर
कोल्हापूर मधील वारांगना सखी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन सेक्स वर्कर यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख यांचे लक्ष वेधू, असे आश्वासन त्यांना दिले.
काही दिवसांपूर्वी स्टेशन रोडवर सुरू असणारा देहविक्रीय व्यवसाय शिवसेनेने आंदोलन करून बंद पाडला आहे. नागरिकांच्या तक्रारीमुळे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी या प्रश्ननी वारांगना संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांच्या नेतृत्बाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली आणि सेक्स वर्कर यांच्या पुनर्वसबाबत तसेच त्यांच्या उदरनिर्वाहमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली. या प्रश्ननी जिल्हाधिकारी येडगे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांचे लवकरच लक्ष वेधू, असे सांगितले. दरम्यान, वारांगना
सखी संघटनेने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचीही भेट घेतली आणि त्यांचेही या प्रश्ननी लक्ष वेधले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.