लव मॅरेज करताना पालकांची परवानगी बंधनकारक करावी : शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोल्हापूर, ता..१२ – (प्रतिनिधी) प्रेम विवाह करत असताना पालकांची समंती असणे बंधनकारक करावे, उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर मुलाच्या विवाहाचे वय २१ वर्षे आहे, त्याच पद्धतीने मुलीच्या विवाहाचे वय देखील २१ वर्षे करावे, या आणि अन्य मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे (शिंदे गट) करवीर तालुकाप्रमुख तथा पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णात पवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांना सादर केले.
कृष्णात पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
सध्या लव मॅरेज करीत असताना मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन तासात प्रेम विवाह करतात. त्यामुळे लँड जिहाद , लव जिहाद, वोट जिहाद, टार्गेट किलिंग यासारखी मनसुबे समोर ठेवून हे सर्व प्रकार सुरू आहेत. कायद्याने अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सज्ञान असल्यामुळे मुलांचे पालक किंवा आई-वडील हतबल होतात. पण त्याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक स्वरूपाचे असून मुलगी, मुलगा सज्ञान असल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात मुलींना एकुलती एक पाहून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते व लग्न केल्यानंतर एक तर त्या मुलीचा मानसिक किंवा शारीरिक छळ केला जातो. कारण मुलींनी प्रेम विवाह केला असल्याने पालकांचा त्यांच्याशी संपर्क बंद झालेला असतो. त्यामुळे अशा मुली एक तर आत्महत्या, देह विक्री , धर्म परिवर्तन व वाम मार्गास लागून त्यांना अत्यंत वेदनादायी प्रकारास सामोरे जावे लागते किंवा सोडचिट्टी घेऊन एकांताचे जीवन जगतात. पालकांनी आई-वडिलांनी आपल्या मुला, मुलींना चांगले शिक्षण देऊन संगोपन करून तिच्या ती सुखी रहावी या उद्देशाने जमवलेली आपली सर्व पुंजी व प्रसंगी कर्ज शेती विंक्री करून खर्च केला जातो.
हे सर्व प्रकार थांबवायचे असल्यास गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांनी ज्या प्रकारे लव मॅरेजसाठी पालक किंवा आई-वडिलांचे संमती आवश्यक असल्याचा कायदा केला आहे, त्या प्रकारे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील गृहविभागाकडून लव मॅरेज प्रकरणाची माहिती अहवाल घेऊन असा आपण कायदा करावा. तसेच मुलांचे लग्नासाठी 21 वर्षे आहेत, त्याचप्रमाणे मुलींचेही वय लग्नासाठी 21 वर्षे करावीत, जेणेकरून स्त्री- पुरुष समानता येईल व मुलगी विचाराने व शैक्षणिक पात्रतेने प्रगल्भ होईल व तिला तिच्या आयुष्यात योग्य निर्णय घेता येईल तसेच सध्या अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर जे काही नुकसान होत आहे, त्या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडेल व होणारा दुराचार व दुष्परिणामांना आळा बसेल. यामुळे या विषयाचा गांभीर्याने विचार करून यावर त्वरित योग्य निर्णय व्हावा.
या मागणीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांना निवेंदन देण्यात आले.
यावेळी उपसरपंच अमर उरुणकर, ग्रामपंचायत सदस्या गीता चौगुले , शारदा पोवार, राणी पाटील, तसेच विविध संस्थेतील पदाधिकारी भानुदास पाटील, विश्वास पाटील, पांडुरंग हुजरे, शिवाजी पाटील, विनोद पाटील ,जालिंदर पाटील, भगवान मोरे, बाजीराव पाटील, बाबासो पाटील, अमर शिंदे, बी.जी पाटील, भगवान मोरे, तानाजी चौगुले, संदीप चौगुले, सरदार खाडे, सौरभ पोवार, नाथाजी पाटील राजू उरुणकर, शिवाजी साळुंखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते