अनेक संकटे आणि अनेक आव्हाने पार करत एसटीने मार्गक्रमण केले आहे. एसटी समोर आजही विविध अडचणी आहेत. मात्र या अडचणींना समर्थपणे तोंड देत एसटीने टीकाकार यांंची तोंड बंद केले आहेत. अशीच कामगिरी एसटीने यंदा केली आहे. यंदा 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत एसटीने तब्बल 468 कोटी 28 लाख 17 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे आणि या उत्पन्न मध्ये मागील वर्षीपेक्षा सुमारे 36 टक्के इतकी वाढ झाली आहे.
एसटीने आपल्या विविध सोयी सवलती विद्यार्थी जेष्ठ नागरिक आणि महिला यांच्यासाठी बहाल करून चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे, आणि ही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. एसटीने विविध अडचणींना सामोरे जात यंदा भरघोस उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षी एसटीने 345 कोटी 40 लाख 35 हजार इतके उत्पन्न मिळवले होते. वास्तविक 2022 मध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल 18 दिवस संप पुकारला होता. त्यामुळे मागील वर्षी एसटीच्या उत्पन्नावर थोडाफार परिणाम जाणवला. मात्र,
यंदा हे उत्पन्न 468 कोटी 48 लाख 17 हजार इतके झाले आहे. एसटीच्या सध्या 731 बसेस मार्गावर आहेत. बंद बसचे प्रमाण कमी आहे. याशिवाय महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना अशा योजनांमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसत आहे, मागील वर्षाच्या उत्पन्नापेक्षा यंदा सुमारे 36 टक्के इतकी वाढ झाली आहे, अशी माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री. बागरे यांनी समाज धन टाइम्सशी बोलताना दिली.
एसटीच्या 12 आगारा पैकी कोल्हापूर आगाराने सर्वाधिक 80 कोटी 74 लाख 76 हजारचे उत्पन्न मिळवले आहे. त्याखालोखाल इचलकरंजीने 63 कोटी 71 लाख 19 हजारचे उत्पन्न मिळवले आहे. तर 49 कोटी 72 लाख 30 हजारचे उत्पन्न मिळवून गडडिंग्लज आगार तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संभाजीनगर आगारने 49 कोटी 49 लाख 92 हजार, गारगोटीने 51 कोटी 8 लाख 24 हजार इतके उत्पन्न मिळवले.
अन्य आगारचे उत्पन्न असे…
मलकापूर -23 कोटी 44 लाख 69 हजार
चंदगड – 26 कोटी 91 लाख 3 हजार
कुरुंदवाड – 27 कोटी 43 लाख 40 हजार
कागल – 36 कोटी
78 लाख 78 हजार
राधानगरी – 29 कोटी 73 लाख 81 हजार
गगनबावडा – 8 कोटी 52 लाख 37 हजार
आजरा – 21 कोटी 17 लाख 70 हजार.
दरम्यान, एसटीने प्रवासी उत्पन्न भरारी घेतली असली तरी एसटीच्या प्रवाशांना आजही काही मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरांतर्गत त्यांना निवारा शेडची कमतरता भासत आहे, काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत आहे, आज एसटीच्या 731 गाड्या मार्गावर आहेत, ही चांगली गोष्ट आहे, मात्र त्याही सुस्थितीत असणे तितकेच गरजेचे आहे अशी प्रवाशी यांची माफक मागणी आहे.