कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिसनर्स असोसिएशनची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदासाठीची निवडणूक २०२४ – २५ उद्या ता. 12 रोजी कसबा बावडा रोडवरील न्याय संकुल येथे होणार आहे.
या निवडणुकीसाठी कवाळे पॅनल आणि धुमाळ पॅनल यांच्यात लढत पहावयास मिळेल. तर सेक्रेटरी पदाची निवड यापूर्वीच बिनविरोध झाली आहे.
कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिसनर्स असोसिएशन ही ज्युनिअर वकिलांची शिखर संस्था आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून या वकिलांचे प्रश्न सोडवण्यात येतात तसेच कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे या मागणीसाठीही पाठपुरावा करण्यात येतो. या असोसिएशनची निवडणूक उद्या सकाळी दहा ते पाच या वेळेत होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी होणार असून सायंकाळी साडेपाच ते सहा या वेळेत निकाल लागणार आहे.
या निवडणुकीसाठी जवळपास 175 मतदार आहेत. कवाळे गटाकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एडवोकेट दत्ताजी कवाळे तर उपाध्यक्ष पदासाठी सागर शिंदे हे निवडणूक रिंगणात आहेत. तर धुमाळ गटाकडून सुनील धुमाळ हे अध्यक्षपदासाठी तर बालाजी राखुंडे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.